वैष्णवांची मांदियाळीचे हिंगणे होम कॉलनीत बंडूशेठ तांबे यांच्याकडून आदरपूर्वक स्वागत

0

कर्वेनगर हिंगणे होम कॉलनी येथील सभागृहात सालाबाद प्रमाणे याही वर्षी वारकरी 20 जून व 21 जून2025 रोजी मेळावा संपन्न झाला. साधू संत येती घरातच दिवाळी दसरा याच उत्साह बंडूशेठ तांबे यांनी केलेला आदरपूर्व स्वागत आणि घराघरात सुरू झालेली लगबग यामुळे होम कॉलनी परिसरात एक उत्सवाचे स्वरूप प्राप्त झालेलं होतं. भव्य दिव्य अशा मंडपात् वारकऱ्यांच्या सोबत् कर्वेनगर हिंगणे होम कॉलनी व परिसरातील नागरिकांनी तसेच महिला पुरुष तरुण मुलं मुली या सर्वांनी फुगडी झिम्मा  कीर्तन भजन भारुड इत्यादी कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला. वारकऱ्यांचे वास्तव्य होम कॉलनी सभागृहात करण्यात आले होते.

आरोग्य सेवा फाउंडेशनच्या लहान मुलांनी आई-वडिलांची सेवा आजी-आजोबांची सेवा कशी करावी या उद्देशाने वारकरी बंधू भगिनींची तेल मालिशची सेवा देण्यात आली.सदर कार्यक्रमाचे अन्नछत्र नियोजन माननीय श्री रामराव कदम ,अशोक कदम, सोपान कावळे, कल्याण कदम व श्रीमती कुसुम नामदेव कदम व त्यांच्या सहकाऱ्यांनी अतिशय उत्तमरीत्या केले त्याचप्रमाणे सेवा आरोग्य फाउंडेशनच्या वतीने सुद्धा वारकऱ्यांचे आरोग्य तपासणी करून त्यांना योग्य ते औषधोपचार मोफत देण्यात आले त्याचप्रमाणे वारजे येथील आदर्श पतसंस्थेच्या वतीने सर्व वारकऱ्यांना आरोग्य किटचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ते शुभम शिंदे यांनी केले व आभार प्रदर्शन आनंद उर्फ बंडूशेठ तांबे व दिंडी चालक हरिभक्त परायण माननीय श्री विश्वंभर घुमरे महाराज यांनी  मानले. कार्यक्रमाच्या आयोजनात किंग ऑफ किंग ग्रुप कर्वेनगर दहीहंडी उत्सव समिती, समर्थ सेवा रिक्षा प्रतिष्ठान पुणे शहर व जिल्हा, हिंगणे होम कॉलनी विकास मंच , महाराष्ट्राची रणरागिनी महिला संघटना यांनी मोलाचे योगदान दिले.

अधिक वाचा  राज्यात सत्ता बदलाचे केंद्र मुंबई पुणे ठरणार? महाराष्ट्रात आता 2 नाही 3 आघाड्या? 

याच दिवशी जागतिक योगा दिन असल्यामुळे कमिन्स कॉलेजच्या वतीने तसेच माजी नगरसेविका वृषालीताई दत्तात्रय चौधरी यांच्या वतीने योग गुरु संजय तापकीर यांनी अतिशय छान योगसाधना वारकऱ्यांना प्रात्यक्षिक करून शिकविली. या कार्यक्रमात पुणे महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त दीपक राऊत,  वरिष्ठ आरोग्य निरीक्षक  श्री गणेश खीरीड, आरोग्य निरीक्षक श्री घटकांबळे साहेब आरोग्य  निरीक्षक श्री राजेश आहेर साहेब स्वच्छता विभागाचे सर्व कर्मचारी त्यांचे सर्व सहकारी त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य कृषी पर्यटन महामंडळाचे अध्यक्ष श्री बाळासाहेब बराटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष श्री माणिक शेठ दुधाने, माजी नगरसेविका वृषालीताई चौधरी, माजी स्वीकृत नगरसेवक दत्ताभाऊ चौधरी, माजी नगरसेवक सुशीलजी मेंगडे, शिवसेनेचे ज्येष्ठ पदाधिकारी व कर्वेनगर परिवर्तन आघाडीचे संस्थापक माननीय श्री  सुनील तोडकर, पत्रकार माऊली म्हेत्रे, पत्रकार धनराज माने, वाय एम सी कॉलेज ग्रुपचे सदस्य बंडूशेठ हरपुडे त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोथरूड विधानसभेच्या उपाध्यक्ष सौ तेजलताई दुधाने, मयूर दुधाने, ज्येष्ठ शिवसैनिक जगदीश दिघे ,वैशाली जगदीश दिघे, रत्ना कट्ट्याचे संस्थापक सदस्य सुनील तोडकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे कोथरूड विधानसभा  संघटक सचिव राजू गाडेकर व परिसरातील ज्येष्ठ नागरिक संघाचे सर्व सदस्य गणेश मंडळाचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी महिला व योगा ग्रुप चे सर्व सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते.

अधिक वाचा  भगवान गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोन महामानवांच्या जीवनात साम्य आहे – राजेश घाडगे