‘कोथरूड’ नवा ट्विस्ट संपुर्ण शहरात ‘भाकरी फिरवा’ हा नगरसेवकांचा पक्षाला संदेश? मविआची उमेदवारी ‘होल्ड’ ?

0

पुणे : कोथरूड विधानसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवार अमोल बालवडकर यांच्या घरी जाऊन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी तब्बल 2 तास चर्चा केली समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु ही चर्चा यशस्वी झाली नाही यामुळे कोथरूडची समीकरणे वेगाने बदलताना दिसत असून महायुती अन् मविआच्याच दोन्ही गोटात ‘कोथरूड’ नवा ट्विस्ट आला असून ‘छाव्या’च्या स्वाभिमानी भूमिकेमुळे मविआची उमेदवारीही ‘होल्ड’ झाली असल्याची चर्चा सध्या मतदारसंघात सुरू झाली आहे.

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे घरी येऊन देखील चर्चा निष्फळ ठरल्याने पुणे शहरातील भारतीय जनता पक्षाची गणिते बिघडण्याची शक्यता निर्माण झाली मुळात क्रमांक दोनचे पद असलेल्या चंद्रकांतदादा पाटील यांच्या विरोधातील बंडखोरी जर भारतीय जनता पक्षाला टाळता नाही आली तर पुणे शहरातील भारतीय जनता पक्षाच्या वाट्याला आलेल्या पर्वती(सभागृह नेते) शिवाजीनगर(माजी आमदार पुत्र) खडकवासला (अँटी इन्कमबन्सी 3 चेहरे) आणि पुणे कॅन्टोन्मेंट(कायम एकच घर) या सर्वच मतदारसंघांमध्ये बंडखोरांना बळ मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. भारतीय जनता पक्षाच्या वतीने सर्व बंडखोरांना ही समजूत करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. सध्या कोथरूड भाजप हा भूकंपाच्या उंबरठ्यावर असल्याचं बोललं जातं असलं मोठा धोका हा पुणे शहरात ताब्यात असलेल्या पाच विधानसभा मतदारसंघांमध्ये निर्माण झाला आहे. जोपर्यंत पक्ष उमेदवारी जाहीर करत नाही तोपर्यंत मी आशावादी आहे. मला अपेक्षा आहे मला उमेदवारी मिळेल अशी प्रतिक्रिया बालवडकर यांनी दिल्याने पुणे महानगरपालिकेतील या सर्व माजी नगरसेवकांची एक टीम तयार झाली असून पक्षाला ‘भाकरी फिरवा’ हा संदेश देण्यासाठी परिस्थिती एवढी ताणली जात आहे अशी ही चर्चा कार्यकारणी मध्ये आहे.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

कोथरूड मतदारसंघात भाजपाचे पदाधिकारी बालवडकर यांच्या कार्यक्रमांना जात नसल्याने नाराज अमोल बालवडकर यांनी आक्रमक होत चंद्रकांत दादांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. बालवडकर भाजपा सोडण्याच्या विचारार्थ् चर्चा देखील हेतू:हा राजकीय रिंगणात घडवल्या जात असताना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी थेट अमोल बालवडकर यांच्या घरी जाऊन त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. ही बाब राजकीय वर्तुळात व पुणे शहराच्या राजकारणात महत्त्वपूर्ण असल्याने मतदारसंघाची गणिते बदलण्यास सुरुवात झाली आहे. कोथरूड विधानसभेचा संग्राम जर भाजपच्या उमेदवाराला विजयी करायचा असल्यास 1 लाख 30 हजारांचे प्रतिनिधित्व असणाऱ्या या भागातील संघनिष्ठीत श्रीराम भक्त हिंदुत्ववादी नव्या छाव्याची हालचाल महत्वाची झाली आहे. आजही भारतीय जनता पक्षाकडे अधिकृतपणे उमेदवारीसाठी इच्छुक होत धोरणात्मक भूमिका ठेवलेल्या अमोल बालवडकर यांची भुमिका महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

पुण्यातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना भेटण्यासाठी पुण्यातील सर्वच बडे नेते, इच्छुक आणि विद्यमान आमदार देखील आले होते. मात्र या सगळ्यात कोथरूडमधून आक्रमक प्रचार करणारे आणि चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात आपली प्रबळ दावेद्वारे सांगणारे अमोल बालवडकर हे उपस्थित नव्हते.  त्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे पुण्यात असताना अमोल बालवडकर यांची भेट घेऊन त्यांची नाराजी दूर करतील अशी शक्यता होती. मात्र अमोल बालवडकर यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सर्वच बैठकांकडे पाठ फिरवली. कोथरूडमधील वातावरण तापलेलं दिसत असताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्वतः अमोल बालवडकर यांच्या घरी जाणं पसंत करत त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

सध्या चंद्रकांत दादा पाटील यांची उमेदवारी भाजपा मधून निश्चित मानली जात असली तरी मागील वेळी विद्यमान आमदार असलेल्या मेधा कुलकर्णी यांचे तिकीट पक्षासाठी कापण्यात आले होते. हा इतिहास पाहता भाजपामध्ये कोथरूड मतदारसंघात माजी प्रदेशाध्यक्ष राहिलेले आमदार चंद्रकांत दादा पाटील यांचे तिकीट कापले जाणार की कोथरूडमध्ये भाजपा विरुद्ध भाजपा बंडखोर असा सामना पाहायला मिळणार  याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.