जरांगे यांना खुलं आव्हान आहे की त्यांनी निवडणूक लढवावी – प्रविण दरेकर

0

मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर सतत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळालं नसल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मराठ्यांना आरक्षण द्यायचे आहे पण देवेंद्र फडणवीस त्यांना रोखत असल्याचा आरोप जरांगे यांनी केला होता. त्यावर भाजप नेते प्रविण दरेकर यांनी उत्तर दिले आहे, ते म्हणाले की, जरांगे पाटील हे कुणाचा एन्काऊंटर करतायेत. भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी महाविकास आघाडीचे एन्काऊंटर करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. आमचं जरांगे यांना खुला आव्हान आहे की त्यांनी निवडणूक लढवावी. सुपारी घेतल्यासारखा बोलू नये. जरांगे केवळ फडणवीस यांच्यात द्वेषातून कुणाची तरी सुपारी घेतल्यासारखं वारंवार बोलत आहेत. लोकांच्याही आता ते लक्षात आलंय.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

‘सत्य परेशान हो सकता है मगर पराजित नही हो सकता. अगदी तसेच देवेंद्र फडणवीस हे जरांगेमुळे परेशान होऊ शकतात पण ते पराजित नक्कीच होणार नाहीत. उलट विजयी होतील आणि मोठ्या फरकाने विजयी होतील हा आमचा विश्वास आहे.

श्याम मानव यांनी मानवतेच्या दृष्टिकोनातून लाडक्या बहिणी बद्दलचे विधान केले आहे. त्याचे आम्ही स्वागत करतो. लाडकी बहीण योजना ही सुपरहिट ठरली आहे आणि महायुती मोठ्या फरकाने विजयाकडे घोडदौड करतेय असेच मी म्हणेन.

पाच आमदारांच्या बद्दल नेमकी कुठून माहिती आली हे मलाही माहित नाही. कारण मी केंद्रीय संसदीय समितीच्या बैठकीत होतो. असा कुठलाही प्रस्ताव पास झाला नाहीये. कुणाचे टिकीट कापले जाणार नाहीये. त्या केवळ पेरलेल्या बातम्या आहेत.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन

मला एवढेच सांगायचे की महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रीपदाचे बरेच चेहरे आहेत आणि प्रत्येकाला आता डोहाळे लागलेले आहेत. यातूनच अनिल परब, उद्धव ठाकरे यांच्या बद्दल मुख्यमंत्रीपद मिळेल असं विधान करतात, त्यातूनच मग जयंत पाटलांनी ही डोहाळे लागले आहेत. अशी टीका प्रविण दरेकर यांनी केली आहे.