मागाठाणे विधानसभा मतदारसंघातील सध्याची स्थिती काय?; मतदारसंघाचा इतिहास, वाचा…

0

सध्या विधानसभेची निवडणूक सुरु आहे. येत्या 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. सगळ्याच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी केली आहे. कोणत्या मतदारसंघात कुणाला उमेदवारी दिली जाणार? याची चर्चा होतेय. मुंबईमध्येही यंदा चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. कारण महायुती विरूद्ध महाविकास आघाडी असा सामना पाहायला मिळणार आहे. मुंबईतील मागाठाणे विधानसभा मतदारसंघातील सध्याची स्थिती काय आहे? याबाबत जाणून घेऊयात…

मागाठाणे विधानसभा मतदारसंघाचा इतिहास
दहिसरचा काही भाग आणि बोरिवलीचा काही भाग मिळून मागाठाणे हा विधानसभा मतदारसंघ तयार झाला. 2009 ला या मतदारसंघाची निर्मिती झाली आहे. मराठी भाषिक मतदार या मतदारसंघात अधिक आहे. 2009 ला पहिल्यांदाच या मतदारसंघात मतदान झालं. तेव्हा मनसेत असणारे प्रविण दरेकर या मतदारसंघात विजयी झाले होते. त्यानंतर 2014 ला प्रकाश सुर्वे हे विजयी झाले. राष्ट्रवादीला रामराम करत प्रकाश सुर्वे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांनी ही जागा जिंकली. तर 2019 ला प्रकाश सुर्वे यांनी पुन्हा एकदा या मतदारसंघातून निवडून आले.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

सध्याची राजकीय परिस्थिती काय?
2022 ला शिवसेनेत उभी फूट पडली. एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत जात सत्ता स्थापन केली. यावेळी शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांमध्ये प्रकाश सुर्वे यांचंही नाव आहे. त्यामुळे यंदाच्या या निवडणुकीत महायुती कुणाला उमेदवारी देणार? प्रकाश सुर्वे यांना पुन्हा उमेदवारी मिळणार का? तसंच महाविकास आघाडी कुणाला निवडणुकीच्यां रिंगणात उतरवणार? हे पाहावं लागणार आहे.

यंदा शिवसेनेत उभी फूट पडली आहे. प्रकाश सुर्वे यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता या मतदारसंघातील परिस्थिती वेगळी आहे. यंदा होणाऱ्या या निवडणुकीत महायुती विरूद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना होणार आहे. दोन्ही बाजूने कुणाला उमेदवारी दिली जाते हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

2019 च्या निवडणुकीचा निकाल?
2019 च्या विधानसभा निवडणुकीत मागाठाणे मतदारसंघात प्रकाश सुर्वे विजयी झाले होते. 90,206 मतं प्रकाश सुर्वे यांना मिळाली होती. तर मनसे पक्षाचे नयन कदम यांना 49,146 मतं मिळाली होती. भाजपचे हेमेंद्र रतीलाल मेहता यांनीही मागाठाणेतून निवडणूक लढली होती.