मनोज जरांगेंची मागणी योग्यच, मराठा आरक्षणाला आमचा जाहीर पाठिंबा; शरद पवारांनीही मांडली भूमिका

0

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या उपोषणाला शरद पवार यांनी पाठिंबा दिला आहे. रत्नागिरीमध्ये शरद पवार एका कार्यक्रमाला आले होते. त्यावेळी बोलताना शरद पवार यांनी मनोज जरांगे पाटील यांची मागणी योग्यच आहे. एकप्रकारे शरद पवार यांनी मराठा आरक्षणाला जाहीर पाठिंबा असल्याचे सांगितले.

शरद पवार यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आमरन उपोषणाला पाठिंबा दिला. जरांगे यांची मागणी योग्य असल्याने आरक्षणाला पाठिंबा आहे. त्याशिवाय इतर समाजाचाही विचार व्हावे, असे वक्तव्य शरद पवार यांनी केले.

शरद पवार काय म्हणाले ?

एक देश एक निवडणूकबाबत कायदेशीर लढाई आणि मार्ग काढणे गरजेचं आहे.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

घरात तरी काका आणि पुतणे एकत्र आहेत.

पहिल्यांदा आम्ही तिघांनाचा निर्णय घेऊ आणि त्यानंतर मग छोट्या पक्षांना बरोबर घेऊन त्यांना किती जागा द्यायचा याबत निर्णय घेऊ.

मुंबई गोवा महामार्गसारखा इतका वाईट रस्ता महाराष्ट्रात आहे.

महामार्गाच्या कामात किती बेफिक्रेने पाहिलं जातंय हे दुर्दैव आहे.

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आजचा सातवा दिवस

मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावं या मागणीसाठी जालन्यातील अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरू आहे, त्यांच्या आमरण उपोषणाचा आजचा सातवा दिवस आहे. आज संभाजीराजे छत्रपती हे मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला येणार आहेत, दहा ते अकरा वाजेच्या दरम्यान छत्रपती संभाजी राजे आंतरवालीत पोहोचतील आणि त्यानंतर जरांगे पाटील यांच्याशी चर्चा देखील करणार आहेत. दरम्यान आज कॅबिनेटची बैठक असून, या कॅबिनेटमध्ये मराठा आरक्षणावर काही तोडगा निघतो का हे पाहणं महत्त्वाच असणार आहे.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

अहमदनगर बंद –

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ अहमदनगर येथील मराठा आंदोलकांनी आज जिल्हा बंदची हाक दिली आहे. अहमदनगर जिल्हा बंदच्या पार्श्वभूमीवर सकाळच्या टप्प्यात व्यापाऱ्यांनी दुकान बंद ठेवली आहेत.मनोज जरांगे यांना समर्थन देण्यासाठी नगर शहरातील तहसील कार्यालयासमोर सकल मराठा समाजाच्या वतीने मागील तीन दिवसांपासून उपोषण आंदोलन देखील सुरू केलं आहे.आंदोलकांनी मराठा आरक्षणाच्या बाबतीत सगे सोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करावी, मराठा बांधवांवर झालेले गुन्हे त्वरित मागे घ्यावे, हैदराबाद गॅझेट , सातारा गॅझेट आणि बॉम्बे गव्हर्मेंट गॅजेट लागू करावं अशी मागणी आंदोलकांने केली जात आहेत.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

लातूर बंद

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आणि मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लातूरमध्ये मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे. मराठा आंदोलकांकडून बाजारपेठ बंदच आव्हान करण्यात येत आहे. तर या आव्हानाला व्यापाऱ्यांनी देखील उत्स्फूर्त प्रतिसात दिला आहे.सकाळपासूनच बाजारपेठा कडकडीत बंद ठेवण्यात आल्या आहेत.