राज्यात २८८ मतदारसंघात सर्व्हे, कॉंग्रेसकडून मुख्यमंत्री पदाची तयारी सुरु?

0
2

लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला मिळालेल्या उल्लेखनीय यशानंतर राज्यातील काँग्रेसचे चित्र बदलले असून राज्यात किमान 75 ते 80 काँग्रेसचे आमदार निवडून येणार असा सर्व्हे काँग्रेस पक्ष श्रेष्ठींकडे जमा झाल्यानंतर कॉग्रेसकडून मुख्यमंत्री पदाची तयारी सुरु असल्याची माहिती समोर येत आहे. कॉंग्रेसकडून राज्यातील २८८ मतदारसंघात सर्व्हे करण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या महायुती विरोधात वातावरण असून महाविकास आघाडीला सध्या नागरिकांचा प्रतिसाद असून त्याचा फायदा काँग्रेस पक्षाला होईल. महाविकास आघाडीची सत्ता आल्यास काँग्रेसचा मुख्यमंत्री होऊ शकतो अशी मोठी बातमी समोर येत आहे.

गेल्या काही दिवसांआधी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा उद्धव ठाकरे असल्याचं म्हणाले होते. या गोष्टीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाने कानाडोळा केला असला तरी महाराष्ट्रातील आपली पक्षाची वाढलेली ताकद आणि पुरोगामी विचारांचा वाढत असलेला प्रतिसाद या सर्वांचा विचार करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेसच्या वतीनेे आपल्या पक्षाच्या सर्वात जास्त जागा आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. सध्या राज्यामध्ये सर्व पक्षांचे सर्वे सुरू असतात त्यामध्ये प्रत्येक जण आपल्या पक्षासाठी चांगले वातावरण आहे असा दावा करत असतानाच आता महाविकास आघाडीची सत्ता आल्यास कॉंग्रेसचा मुख्यमंत्री होऊ शकतो अशी मोठी बातमी समोर येत आहे.

अधिक वाचा  ‘समस्त कोथरूड’ने देखाव्यांची ‘संस्कृती’च बदलली; सर्वत्र जिवंत देखावे अन् पौराणिक मंदिरे

महाराष्ट्रात सध्या शरद पवार आणि उद्धव ठाकरे या दोन व्यक्तिमत्वन विषयी सहानुभूती असली तरी सुद्धा या दोन व्यक्तींचा फायदा मुळात काँग्रेस पक्षाला जास्त होण्याची शक्यता लक्षात घेऊन पक्षाच्या वतीने त्या दृष्टीने वाटचाल करण्यास सुरुवात केली आहे. कॉग्रेसने केलेल्या सर्व्हेमुळे कॉंग्रेसचा कॉन्फीडन्स वाढल्याचं दिसून येत आहे. नुकत्याच पार पडलेल्या बैठकीमध्ये याबाबत चर्चा करण्यात आली सर्व समावेशक चेहरा निवडण्यासाठी चर्चा केली जात आहे.