भाजप पुणे अधिवेशनात विधानसभा प्रचाराची झलक; घोषणा फलक अन् महाराष्ट्राचा विकास म्हणजे देवाभाऊ!

0

लोकसभा निवडणुकीत पीछेहट झाल्यानंतर आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. पुन्हा सत्तेत येण्यासाठी भाजपकडून आगामी विधानसभा निवडणुकीची रणनीती ठरविण्यासाठी प्रदेश भाजपच्या वतीने पुण्यात अधिवेशन भरविण्यात आले आहे. पुण्यातील बालेवाडी येथील क्रीडा संकुलात होत असलेल्या या अधिवेशनाला 5 हजारांहून अधिक भाजप पदाधिकारी उपस्थित राहिले आहेत. या अधिवेशनात महाराष्ट्रातील वरिष्ठ नेत्यांसोबतच केंद्रातील डझनभर मंत्री आणि केंद्रीय मंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित राहणार आहेत.

आगामी निवडणुकीच्या दृष्टिकोनातून कार्यकर्त्यांना मॉरल बूस्ट देण्यासाठी हे अधिवेशन भाजपसाठी अत्यंत महत्त्वाचं मानलं जात आहे. त्याच दृष्टिकोनातून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना संबोधित करणार आहेत.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

याच अधिवेशनातून आगामी विधानसभा निवडणुकीचा रोड मॅप ठरविण्यात येणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात भाजपच्या कोणत्या लोकप्रिय घोषणा असणार आहेत, याची झलक या अधिवेशनात पाहायला मिळत आहे. या अधिवेशनात आगामी विधानसभेच्या दृष्टिकोनातून ज्या घोषणा भाजप घेऊन जाणार आहे, त्याचे पोस्टर अधिवेशन स्थळावर लावण्यात आले आहेत.

या घोषणांमध्ये लाडकी बहीण योजना तसेच शेतकरी सन्मान योजनेला प्राधान्य दिल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच, आगामी निवडणुकीच्या दृष्टिकोनातून देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा एकदा प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी दिसत आहे. ‘देवाभाऊ म्हणजे महाराष्ट्राचा विकास’ अशा आशयाचे पोस्टर लावण्यात आले आहेत. त्यासोबतच मी आहे महाराष्ट्राचा लाडका भाऊ, मी आहे महाराष्ट्राची लाडकी बहीण, मी आहे महाराष्ट्राचा समृद्ध शेतकरी, ज्येष्ठ नागरिकांना मिळतो आधार; म्हणून पुन्हा एकदा कमळ फुलणार, अशाही घोषणा बघायला मिळाल्या.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा

जगतो शिवरायांचे विचार म्हणून महाराष्ट्रात कमळ फुलणार, देवाभाऊ आभार मला मोफत तीन सिलिंडर मिळणार, मैं भाजप का कार्यकर्ता हू रुकता नही झुकता नही, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत चाय भी पसंत हे और चायवाला भी आणि अमित शहा यांच्याबाबत ‘जान देंगे इसके लिये, आप क्या बात कर रहे हो’ अशा आशयाची पोस्टर या अधिवेशनात पहायला मिळाली.