तीन मतदासंघात विजय शक्य पण पुण्यात खांदेपालट करा; …नाहीतर दिल्लीत जाऊ : आजी-माजी आमदार एकवटले

0

पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीत पुण्यातील जागांवर विजय मिळवायचा आसेल, तर शहराध्यक्ष बदला, अशी मागणी काँग्रेसच्या विरोधी गटाने पक्षश्रेष्ठींकडे केली आहे. या संदर्भात प्रदेश काँग्रेसकडून न्याय न मिळाल्यास दिल्लीतील नेत्यांकडे धाव घेण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

काँग्रेसमध्ये उफाळून आलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर शहरातील काही नेत्यांनी नुकतीच मुंबईत पक्षाचे राज्य प्रभारी रमेश चेन्नितला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात आणि विजय वडेट्टीवार यांची भेट घेतली. आमदार रवींद्र धंगेकर, तसेच माजी मंत्री रमेश बागवे, दत्ता बहिरट, अविनाश बागवे, रमेश अय्यर, जया किराड, नरुद्दीन सोमजी, विजय खळदकर आदी या वेळी उपस्थित होते.

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता

पुणे शहराध्यक्षांना बदलण्याची मागणी

कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे रवींद्र धंगेकर आमदार आहेत. पुणे कँटोन्मेन्ट आणि शिवाजीनगर या जागांवर काँग्रेसने गेल्या निवडणुकीत चांगली लढत दिली होती. बागवे कँटोन्मेंटमधून, तर बहिरट शिवाजीनगरमधून इच्छुक आहेत. लोकसभेच्या निवडणुकीनंतर काँग्रेस पक्षासाठी देश व राज्यातही चांगले वातावरण आहे. मात्र, या मतदारसंघांमध्ये येत्या निवडणुकीत विजय मिळवायचा असेल, तर शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांना बदलण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. या वेळी नेत्यांनी पर्यायी नावांबाबत विचारणा केली असता माजी नगरसेवक चंदू कदम यांचे नाव पुढे करण्यात आले आहे.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

…नाहीतर दिल्लीत जाऊ

प्रदेश स्तरावर या तक्रारींच्या दखल घेऊन कार्यवाही न झाल्यास नाही, तर दिल्लीच्या नेत्यांचे दरवाजे ठोठावण्याचा इशाराही देण्यात आला. विधानसभा निवडणुकीस तीन महिनेच शिल्लक असताना आमदार-माजी आमदार खुलेपणाने मैदानात उतरले असून शहरात सुरू झालेल्या या गटबाजीचे निवडणुकीत पडसाद उमटू शकतात, अशी चर्चा सुरू झाली आहे.

तक्रारी कोणत्या?

– लोकसभा निवडणुकीत काही जणांनी पक्षाच्या उमेदवारांचे मनापासून काम केले नाही

– निवडणूक व्यवस्थापनामध्ये दुर्लक्ष करण्यात आले

– संघटनेच्या कार्यक्रम-आंदोलनांमध्ये सर्वांना सहभागी करून घेण्यात येत नाही.

– हे चित्र बदलण्यासाठी सर्वांना बरोबर घेऊन जाणारा अध्यक्ष हवा

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार