मंत्रिमंडळ विस्तार? विधान परिषद विजय उत्सव सूरू असताना अजित पवार दिल्लीत, अमित शाहांसोबत बैठकही

0

विधान परिषदेच्या ११ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीवर महायुतीने दणदणीत विजय मिळवला. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने पाच जागांवर विजय मिळवत शरद पवार यांना धक्का दिला. त्याचवेळी अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेनेने दोन, दोन जागा जिंकल्या. शिवसेना आणि राष्ट्रवादीचे दोन्ही उमेदवार पहिल्याच फेरीत निवडून आले. राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेल्या या यशानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार शनिवारी तातडीने दिल्लीला पोहचले. त्यांनी भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली. या भेटीनंतर अजित पवार पुन्हा मुंबईत परत आले.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा

भेटीत या विषयांवर चर्चा

उपमुख्यमंत्री अजित पवार शनिवारी अचानक दिल्ली दौऱ्यावर गेले. दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची अजित पवार यांनी भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. या भेटीत विधान परिषद निवडणुकीसह आगामी मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. तसेच या भेटीत विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. ही भेट घेऊन अजित पवार तातडीने मुंबईला रवाना झाले.

तेव्हा काकाच ठरले श्रेष्ठ, आता पुतण्याची बाजी

लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वाधिक फटका बसला होता. अजित पवार यांची केवळ एक जागाच निवडून आली. त्यामुळे राष्ट्रवादीत पुतण्यापेक्षा काकाच श्रेष्ठ आहे, अशी चर्चा सुरु झाली होती. परंतु आता विधान परिषद निवडणुकीत काकांच्या पक्षातील म्हणजे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमधील मते देखील फुटली आहे. अजित पवार यांनी त्यांच्या पक्षातील एकही मत फुटू दिले नाही. त्यामुळे पुतण्याने काकावर मात केल्याचे म्हटले जात आहे.

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता