अजित पवार धाराशिवच्या दर्ग्यात, शमशोद्दीन गाझी दर्ग्यात चादर चढवली!

0

लोकसभा निवडणुकीचे वारे आता देशात चांगलेच वाहू लागले आहेत.महारष्ट्रात देखील वातावरण तापले आहे. काल अजित पवारांनी सुनेत्रा पवारांचा उमेदवारी अर्ज भरण्याअगोदर पुण्यातील दगठूशेठ मंदिरात आरती केली. त्यानंतर आज पवारांनी धाराशिवच्या प्रसिद्ध हजरत ख्वाजा शमशोद्दीन गाझी दर्ग्याला भेट दिली आहे. दर्ग्यात चादर चढवली आणि प्रार्थना केली.

धाराशिव येथील सुफी संत हजरत ख्वाजा शमशोद्दीन गाझी यांचा दर्गा असून हा अतिशय प्रसिद्ध आहे. एप्रिल- मे महिन्यात दरवर्षी येथे ऊरुस भरतो. आज अजित पवार धाराशिवच्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांनी हजरत ख्वाजा शमशोद्दीन यांच्या मजारावर चादर चढवली आणि प्रार्थना केली. डोक्यावर टोपी आणि फुलांची चादर घेऊन अजित पवार दर्ग्यत आले. त्यांच्या सोबत राणा जागजगीतसिंह पाटील, अर्चना पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थिती होते .दर्गा समितीच्यावतीने अजित दादांचा सत्कार देखील करण्यात आला.

अधिक वाचा  पक्ष प्रवेशातच वादळ काँग्रेस, उबाठा माजी नगरसेवकांचा प्रवेश; मंत्री महोदयांसमोर कार्यकर्ते भिडले बंदोबस्त तैनात

धाराशिवच्या महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या प्रचारासाठी आले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि चंद्रशेखर बावनकुळे धाराशिव शहरात दाखल झाले. धाराशिव मध्ये अहिल्यादेवी चौकात अजित पवार चंद्रशेखर बावनकुळे यांचे कार्यकर्त्याकडून जंगी स्वागत झाले. स्वागतासाठी उमेदवार अर्चना पाटील यांच्यासह महायुतीचे नेते पदाधिकारी, कार्यकर्ते, उपस्थित होते. या देवस्थानचे वैशिष्ट्य म्हणजे, या उरुससाठी हिंदू आणि मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. हजरत ख्वाजा यांचे भक्त जगभरात असून उरुसमध्ये हिंदू धर्मासह मुस्लिम समाजाला विविध धार्मिक विधीचे मानपान आहे.

काल दगडूशेठ मंदिरात घेतलं दर्शन

सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी अर्ज करण्यापूर्वी पुण्यातील श्रीमंत दगडशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांच्यासोबत अजित पवार देखील उपस्थित होते. दोघांनी दगडूशेठ गणपतीचं आरती देखील केली. मोठा विजय होऊ दे, यासाठी गणरायाकडे साकडं घातलं, अशी प्रतिक्रिया सुनेत्रा पवार यांनी दिली. तर निवडणुका चांगल्या वातावरणात पार पडाव्यात यासाठी गणपतीचे आशीर्वाद घेतले, असं अजित पवार म्हणाले. गणरायाने मला भरपूर दिले आहे. सगळ्यांचे भलं कर, असे देखील अजित पवार म्हणाले.

अधिक वाचा  बौद्धजन पंचायत समिती मनुवादी विचारांना गाडून खऱ्या अर्थाने लोकशाहीची अंमलबजावणी करणारी संस्था आहे – आनंदराज आंबेडकर