बौद्धजन सहकारी संघाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्हास्तरीय बौद्ध समाज चषक भव्य बैलगाडी शर्यतीचे आयोजन

0

गुहागर दि. १६: (रामदास धो. गमरे) रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करण्यास अग्रगण्य असणाऱ्या बौद्धजन सहकारी संघाला ७५ वर्षे पूर्ण होत असून या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधुन मुंबई गाव शाखेच्या वतीने या वर्षभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे ठरविण्यात आले असून त्यातील एक कार्यक्रम जिल्हास्तरीय भव्य बैलगाडी शर्यत स्पर्धेचे शुक्रवार, दि. २७ मार्च २०२६ रोजी सकाळी ठीक ९:०० वाजता कालभैरव मैदान, झोमडी, गुहागर येथे अखिल रत्नागिरी जिल्हा बैलगाडी चालक मालक सेवा संघ यांच्या मान्यतेने आयोजन करण्यात आले आहे.

अधिक वाचा  पदवीधर-शिक्षक मतदारसंघातील मतमोजणी कशी होते? प्रथम पसंतीत विजय झाला नाही तर पर्याय काय? सविस्तर वाचा

सदर बैलगाडी शर्यत स्पर्धेत घाटी गट फायनलमध्ये प्रथम क्र. ५१,००० व आकर्षक ढाल, द्वितीय क्र. ४१,००० व आकर्षक ढाल, तृतीय क्र. ३१,००० व आकर्षक ढाल, चतुर्थ क्र. २१,००० व आकर्षक ढाल, पंचम क्र. ११,००० व आकर्षक ढाल तसेच आडघाटी गट फायनलमध्ये प्रथम क्र. १२,००० व आकर्षक ढाल, द्वितीय क्र. ८,००० व आकर्षक ढाल, तृतीय क्र. ६,००० व आकर्षक ढाल तर गावठी गट फायनलमध्ये प्रथम क्र. १२,००० व आकर्षक ढाल, द्वितीय क्र. ८,००० व आकर्षक ढाल, तृतीय क्र. ६,००० व आकर्षक ढाल अशी आकर्षक बक्षीसे असून बैलगाडी शर्यत स्पर्धेस बौद्ध समाज चषक असे घोषित करण्यात आले आहे.

अधिक वाचा  गोकुळचा ‘अध्यक्ष’निवड नवा ट्विस्ट; …तरच सतेज पाटलांनाच संधी? फक्त ही नोटीस सर्व २५ संचालकांना विहित वेळेत पाठवणे बंधनकारक

सदर बैलगाडी शर्यत स्पर्धेचे समालोचन वैभव पवार व बंटी चव्हाण हे करणार असून, झेंडा पंच म्हणून सुनील जाधव व नंबर टेकर म्हणून मंदार सकपाळ कामगिरी पाहणार आहेत, सदर कार्यक्रमाचे लाईव्ह चित्रीकरण गणेश हे करणारं आहेत. सदर शर्यतीसाठी घाटी गट प्रवेश फी रु. १७००/- मात्र, गावठी गट प्रवेश फी रु. १५००/- मात्र इतकी आकारण्यात आली आहे सदर फी मनोज गमरे यांच्या ८८८८४६३०८० या गुगल -पे क्रमांकावर जमा करून त्याचा स्क्रीनशॉट त्यांना पाठवावा असे आवाहन बौद्धजन सहकारी संघाच्या वतीने काढण्यात आलेल्या परिपत्रकात तालुका अध्यक्ष सुरेश सावंत, बैलगाडी शर्यत आयोजक अध्यक्ष विद्याधर कदम, बैलगाडी शर्यत आयोजक राजू मोहिते यांनी केले आहे.

अधिक वाचा  सांगली जिल्हा बँकेत दिग्गजांचे अर्ज मागे, 21 पैकी 15 जागा बिनविरोध : पडळकर, घोरपडेंच्या गटात मात्र निवडणूकच होणार