अनंत-राधिका अंबानी जगातलं सर्वात महाग लग्न; 2500 कोटी रुपये लग्नाआधीच्या कार्यक्रमांवर इतके कोटी खर्च?

0

अनंत-राधिका यांचा हा शाही विवाह जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये पार पडला. त्यात देश-विदेशातील अनेक मोठ्या हस्ती सहभागी झाल्या होत्या. 12 जुलै हा तो अविस्मरणीय दिवस होता या दिवशी अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट आयुष्याभरासाठी बंधनात बांधले गेले आहेत. अंबानी कुटुंबाने आपल्या मुलाच्या लग्नासाठी कोणतीही कसर सोडली नाही. हे जगातील सर्वात महागडं लग्न ठरलं आहे.

राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी यांच्या लग्नाकडे संपूर्ण जगाचं लक्ष वेधलं आहे. भारतातील एक सर्वात मोठा लग्न सोहळा म्हणून याकडे पाहिलं जात आहे. मुंबईत 12 जुलैपासून सुरू झालेला हा कार्यक्रम तीन भव्य दिवस चालणार आहे. हा नेत्रदीपक कार्यक्रम पाहण्यासाठी अनेक मोठी लोकं सहभागी झाले आहेत. 12 जुलै रोजी अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा शुभ विवाह पार पडला. यानंतर 13 जुलै रोजी शुभ आशीर्वाद दिले जात आहेत. या जोडप्याला आशीर्वाद देण्यासाठी अनेक मोठ्या हस्ती पोहोचल्या आहेत. 14 जुलै रोजी मंगल उत्सव या भव्य स्वागत समारंभासह समाप्त होणार आहे. लग्नासाठी आमंत्रित पाहुण्यांच्या यादीत जग भरातील अनेक सेलिब्रिटींचा समावेश होता. आंतरराष्ट्रीय आयकॉन, व्यावसायिक, राजकारणी आणि क्रीडा जगतातील अनेक लोकं सहभागी झाले होते.

अधिक वाचा  कोथरूडला ऐन दिवाळीत ‘तात्काळ’ कारवाई धडाका?; भाजपाची एक तक्रार अन् पालिका प्रशासन तडफदार

मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांनी आपल्या ला लाडक्या मुलाच्या लग्नात कोणतीही कसर सोडली नाही. मार्चमध्ये जामनगरमध्ये आधी तीन दिवसीय प्री-वेडिंग पार्टी झाली. यासाठी देखील अनेक मोठी लोकं उपस्थित होती. रिहाना, एकॉन आणि दिलजीत दोसांझ यांनी उपस्थितांचं मनोरंजन केलं. बिल गेट्स, मार्क झुकरबर्ग यांसारखे अनेक अब्जाधीश सहभागी झाले होते. त्यानंतर जूनमध्ये, इटली ते फ्रान्स या नेत्रदीपक लक्झरी क्रूझने व्हीआयपी पाहुण्यांना केटी पेरी आणि बॅकस्ट्रीट बॉईज यांच्या सादरीकरणाने मंत्रमुग्ध केलं.

पाहुण्यांचे जोरदार स्वागत

आपल्या पाहुण्यांचं स्वागत करण्यासाठी अंबानी कुटुंबाने कोणतीही कसर सोडली नाही. पाहुण्यांना आलिशान भेटवस्तू देण्यात आल्या. याशिवाय पाहुण्यासाठी खाजगी चार्टर फ्लाइटची सुविधा करण्यात आली होती. लुई व्हिटॉन बॅग, सोन्याच्या चैन आणि डिझायनर शूजपर्यंत अनेक भेटवस्तू देण्यात आल्या. पॉप स्टार जस्टिन बीबरला ते रॅपर्स बादशाह आणि करण औजिला यांनी देखील या कार्यक्रमात उत्कृष्ट सादरीकरण केले.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

अंबानी यांच्या या कार्यक्रमाची शोभा वाढवणाऱ्या कलाकांरांना अंबानी कुटुंबानी प्रचंड रक्कम दिली. या लग्न सोहळ्यासाठी अंदाजे 5,000 कोटी रुपये खर्च झाल्याचा अंदाज आहे. जगातील हे सर्वात महागडं लग्न ठरलं आहे. याआधी प्रिन्सेस डायना आणि प्रिन्स चार्ल्स यांच्या  विवाहसोहळ्यासाठी 1,361 कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. शेख हिंद बिंत बिन मकतूम आणि शेख मोहम्मद बिन रशीद अल मकतूम यांच्या लग्नात 1,144 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च झाला होता.

इतका पैसा कुठे खर्च झाला

अंंबानी कुटुंबाने आपल्या धाकट्या मुलाच्या लग्नासाठी मोठं आयोजन केलं होतं. जगभरात या लग्नाची अनेक वर्ष चर्चा राहिल. जामनगर प्री-वेडिंग फेस्टिव्हलमध्ये रिहानाला तिच्या परफॉर्मन्ससाठी 74 कोटी रुपये आणि जस्टिन बीबरच्या संगीत रात परफॉर्मन्ससाठी 83 कोटी रुपये देण्यात आले. असा अंदाज आहे की 2500 कोटी रुपये फक्त लग्नाआधीच्या कार्यक्रमांवर खर्च करण्यात आले होते, ज्यामध्ये आलिशान सेलिब्रिटी क्रूझ लाइनर्स, खाजगी जेट आणि सुरक्षा उपायांचा समावेश होता.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार