गांजा तस्करी प्रकरण शिवसेना शिंदेगट माजी पदाधिकारी लक्ष्मी ताठेंना पोलिसांकडून अटक; 190किलो गांजाही जप्त

0

शिवसेना शिंदे गटाच्या माजी महिला पदाधिकारी लक्ष्मी ताठे यांना तेलंगणा पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. नाशिकच्या पंचवटी परिसरातून नाशिक पोलिसांच्या मदतीने तेलंगणा पोलिसांनी लक्ष्मी ताठे यांना ताब्यात घेतले आहे. तेलंगाणाच्या दामेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत 8 जून 2024 रोजी 190 किलो गांजा पकडला होता. याप्रकरणी ही अटक करण्यात आली आहे.

तेलंगणा अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई

तेलंगाणा अंमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई केली होती. या प्रकरणात बीड आणि अहमदनगरच्या दोघा तस्करांना अटक करण्यात आली होती. तपासादरम्यान लक्ष्मी ताठेंच नाव पुढे आल्यानं 1 महिन्यानंतर तेलंगाणा पोलिसांनी अटक केली आहे.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा

शिवसेना शिंदे गटाकडून स्पष्टीकरण 

लक्ष्मी ताठेंना तेलंगणा पोलिसांकडून अटक करण्यात आल्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेने स्पष्टीकरण दिले आहे. लक्ष्मी ताठेंची या आधीच पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. शिवसेनेचा आणि त्यांचा काहीही संबंध नाही, असं शिंदे गटाकडून सांगण्यात येत आहे.