भाजपचा निकालाआधीच जल्लोष; शपथविधीचीही तयारी, तारीखही ठरली, १०हजार लोकसहभागाची शक्यता

0

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया संपली असून उद्या (४ जून) रोजी निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे केंद्रात कोणाचे सरकार येणार? कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार? असे प्रश्न जनतेच्या मनात निर्माण झाले असून त्याबाबतच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. एक्झिट पोलनुसार भाजपला सर्वाधिक जागा मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे भाजपमध्ये सध्या आनंदाचे वातावरण आहे. अशातच भाजपच्या बड्या नेत्यांच्या बैठकांना सुरवात झाली आहे. त्यामुळे एक्झिट पोलच्या निकालाने उत्साही झालेल्या भाजपने नव्या सरकारच्या शपथविधी सोहळ्या संदर्भात मोठा राजकीय कार्यक्रम आखला असल्याची बातमी समोर येत आहे.

दिल्लीत होणार कार्यक्रमाचे आयोजन

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता

दरम्यान, या आठवड्याच्या शेवटी राजधानी दिल्लीत हा कार्यक्रम आयोजित केला जाऊ शकतो. इंडियन एक्स्प्रेसमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, अधिकृत शपथविधीच्या दिवशी हा राजकीय कार्यक्रम भारत मंडपम किंवा कर्तव्य मार्गावर आयोजित केला जाण्याची शक्यता आहे. हे ‘भारताच्या सांस्कृतिक वारशाचे’ शोकेस म्हणून आयोजित केले जाणार आहे ज्यात कदाचित म्युझिक शो आणि प्रकाश शो चा समावेश असणार आहे. त्यात परदेशी सरकारच्या प्रतिनिधींसह ८ ते १० हजार लोक सहभागी होण्याची शक्यता आहे.

एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, शपथविधी समारंभानंतरच्या सांस्कृतिक कार्यक्रमाची योजना अद्याप निश्चित झालेली नाही, परंतु ती ९ जून रोजी होऊ शकते. २०१९ मध्ये, निकाल जाहीर झाल्यानंतर एका आठवड्यानंतर ३० मे रोजी सरकारची शपथ घेण्यात आली.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

राष्ट्रपती भवनात तयारी सुरु

राष्ट्रपती भवनात होणाऱ्या शपथविधी सोहळ्याची तयारी गेल्या आठवड्यातच सुरू झाल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभाग (CPWD) या कार्यक्रमावर ‘आधीपासूनच काम करत आहे’. त्याच वेळी, लोकसभा सचिवालय देशभरातून नवनिर्वाचित खासदारांचा प्रवास, विमानतळ आणि रेल्वे स्थानकांवर त्यांचे आगमन आणि राजधानीत त्यांचा मुक्काम सुलभ करण्यासाठी तयारी करत आहे.

३ एक्झिट पोलमध्ये एनडीए ४०० पार

एनडीए ३८५ ते ४१५ जागा जिंकणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. अन्य पक्षांना २७ ते ४५ जागा जाण्याची शक्यता आहे.

इंडिया टुडेृ-एक्सिस माय इंडियाच्या पोलनुसार एनडीए ३६१ ते ४०१, इंडिया १३१ ते १६६ आणि अन्य पक्षांच्या खात्यात ८ ते २० जागा जाणार आहेत.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

सी व्होटरच्या सर्वेनुसार एनडीएला ३५३ ते ३८३, इंडिया आघाडीला १५२ ते १८२ आणि अन्य पक्षांना ४ ते १२ जागा मिळण्याची शक्यता आहे.

इंडिया टीव्हीच्या एक्झिट पोलमध्ये एनडीएला ४०० पार जागा दाखवल्या आहेत. यामध्ये एनडीएला ३७१ ते ४०१ जागा मिळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर इंडिया आघाडीला १०९ ते १३८ तसेच अन्य पक्षांना २८ ते ३८ जागा मिळण्याची शक्यता आहे.