पुणे शहरात नाल्यांची सफाई करून आपत्कालीन व्यवस्था सज्ज ठेवा; मानकरांची पुणे पालिका आयुक्तांकडे मागणी

0

पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिष्टमंडळाने शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्या नेतृत्वाखाली पुणे महानगरपालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांची भेट घेऊन पुणे शहरातील नाल्यांची तातडीने सफाई करून आपत्कालीन व्यवस्था सज्ज करणेबाबत निवेदन दिले.

जून महिन्याच्या अखेरीस पुण्यामध्ये मान्सून दाखल होत आहे. दरवर्षी होणाऱ्या पावसामुळे पुणे शहरातील अनेक भागामध्ये पाणी साचणे, पावसामुळे रस्त्यांवर खड्डे पडून छोटे मोठे अपघात होतात. तसेच साचलेल्या पाण्यामुळे दुर्गंधी पसरून डेंगू,मलेरिया, हिवताप यांसारखे गंभीर आजार होतात. पावसाळा सुरु होण्यापूर्वी पुणे शहरातील नाले, पावसाळी गटारे यांची साफसफाई करणे, गाळ काढणे ही कामे तातडीने होणे अत्यावश्यक आहे.

अधिक वाचा  पुणे पदवीधर निवडणूक : हर्षदा देशमुखांनी पाहिल्या फेरीतच विजय आणला दृष्टीक्षेपात; कोटापूर्तीस अवघ्या ७३६ मतांची गरज! लादलेल्या उमेदवारीबाबत कार्यकर्त्यांचा स्पष्ट संदेश?

पावसामुळे शहरात पडणाऱ्या खड्ड्याची पाहणी करून त्या खड्ड्याची तातडीने डागडुजी करणे याकरिता पुणे महानगरपालिकेमार्फत यंत्रणा उभी करावी जेणेकरून खड्ड्यामुळे होणारे अपघातांचे प्रमाण कमी होईल.

तसेच पावसामुळे धोकादायक झाडे पडून निर्माण होणारी वाहतूक कोंडी आणि विजेच्या तारा तुटल्याने शॉर्टसर्किट सारख्या घटना यांवरती नियंत्रण आणण्यासाठी आपत्कालीन व्यवस्था तयार करावी. पुणे शहरातील यांसारख्या समस्या लक्षात घेऊन पुणेकरांना होणारा नाहक त्रास दूर करावा, असे सदर  निवेदनात नमूद केले आहे.

सदर निवेदन देताना आमदार चेतन तुपे, मा. नगरसेवक सुभाष जगताप, मा. नगरसेवक सदानंद शेट्टी, गौरी जाधव, अभिषेक बोके, शुभम माताळे,   शाम शेळके, पूजा झोळे, लावण्या शिंदे, माधवी मोरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

अधिक वाचा  पुणे पदवीधरमध्ये सोलापूर, शिक्षकमध्ये सातारा आघाडीवर शिक्षक मतदारसंघ ८५.८७ तर पदवीधर ६२.७८ टक्के मतदान