पाली भाषेला राष्ट्रीय दर्जा मिळवून देण्यासाठी बौद्ध संघटनांनी उठाव केला पाहिजे – प्रा. विजय मोहिते

0

गुहागर दि. २८ (अधिराज्य) “भारत देशावर आजवर अनेकांची आक्रमण झाली आणि देश गुलामीच्या बेडीमध्ये अडकला होता असे सर्वत्र सांगितले जाते व शाळाशाळांतून शिकवले ही जात परंतु या देशात १७०० वर्षे चक्रवर्ती सम्राट अशोक ते सातवाहना पर्यंत अनेक महान बौद्ध राजे होऊन गेले ज्यांनी भारत देश सुजलाम सुफलाम होण्यासाठी दिवसेंरात्र परिश्रम घेतले व बौद्ध धम्माचा प्रचार व प्रसार केला त्याचमुळे भारत देशातून सोन्याचा धूर निघत होता हे कधीच सांगितले जात नाही व याच बौद्ध शासकांनी तीस हुन अधिक विद्यापीठे निर्माण केली होती त्यामुळे जगातील कानाकोपऱ्यातुन अनेक विद्वान विद्यार्थी याठिकाणी येऊन विद्यासंपदान करीत होते, तसेच या बौद्ध शासकांनी अनेक शिलालेख, स्तूप, बौद्धलेणी कोरल्या या कार्यकरता दान देणाऱ्या ज्या व्यक्ती होत्या त्या तत्कालीन महार समाजाच्या होत्या त्यांच्या नावाचा उल्लेख आज पालीभाषेत, मोडीभाषेत आढळतात, आज बुद्धाला काल्पनिक देवांचा अवतार म्हणून सादर केलं जात असताना या देशात कोणत्याही काल्पनिक देवीदेवांची जन्म मृत्यू नोंदणी नाही परंतु तथागत गौतम बुद्धांच्या जन्म मृत्यूची नोंद मात्र उपलब्ध आहे, आज अनेक ठिकाणी पालीभाषेतील शिलालेख, अवशेष सापडत आहेत त्यामुळे पाली ही सर्वात जुनी व प्रमाणित भाषा असल्याने पालीभाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी बौद्ध संघटनांनी एकत्र येऊन उठाव केला पाहिजे” असे प्रतिपादन डॉ. विजय मोहिते यांनी केले.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

बौद्धजन सहकारी संघ ता. गुहागर, जिल्हा रत्नागिरी, गाव व मुंबई शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १३३ वा तसेच तथागत गौतम बुद्धांचा २५६८ वा जयंती महोत्सव संयुक्तरित्या कार्याध्यक्ष विश्वनाथ बाबू कदम यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह, जानवळे, शृंगारतळी ता. गुहागर, जिल्हा रत्नागिरी येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

प्रथम सत्रात सदर प्रसंगी पूज्य भन्ते विमल बोधी यांनी धार्मिक पूजापाठ करून सर्वांना धम्मदेसना देत आपले मौलिक विचार मांडून मार्गदर्शन केले, सदर कार्यास त्यांना सहायक म्हणून संस्कार समिती अध्यक्ष शशिकांत जाधव, सचिव सुभाष जाधव आणि त्यांचे सहकारी कार्यकारी मंडळ व श्रामनेर यांनी ही धार्मिक विधीत सहभाग घेतला होता, सदर प्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्थानिक विभागीय सरचिटणीस महेंद्र महादेव मोहिते यांनी केले तसेच मुंबईचे कार्याध्यक्ष दीपक मोहिते यांनी प्रास्ताविक सादर करताना गेल्या ५ वर्षाच्या कालावधीत बौद्धजन सहकारी संघाच्या वतीने राबविण्यात आलेले श्रामनेर शिबिर, वर्षावास शिबिर आदी उपक्रम तसेच चक्रीवादळा सारखी नैसर्गिक आपत्ती, कोरोना महामारी यावर मदत व बचावात्मक केलेली कार्य यांचा आढावा घेत भविष्यात होणाऱ्या पतपेढी, घटनात्मक फेरफार व बदल, मुलांच्या उच्च शिक्षणासाठी आखलेले उपक्रम आदी उपक्रमांची माहिती दिली. तद्नंतर अध्यक्ष सुनील जाधव व दिपक मोहिते यांनी पाहुण्यांचे शाल, पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन

द्वितीय सत्रात प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, पदवीधर विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची पुस्तके देऊन तालुक्याच्या वतीने त्यांना सन्मानित करण्यात आले. सदर प्रसंगी स्मृती जाधव, असित संतोष सुर्वे आदी मुलांनी दमदार आवाजात आपले विचार व्यक्त करीत सभागृहास मंत्रमुग्ध करून सोडले. तसेच तालुका संघाचे विश्वस्त राजाभाऊ तथा रामदास धो. गमरे, के. सी. जाधव, अध्यक्ष सुनील जाधव, प्रा. अजय मोहिते आदी मान्यवरांनीही शुभेच्छापर आपले विचार व्यक्त केले.

सदर कार्यक्रमास तालुका संघाचे आजी माजी कार्यकर्ते, विभाग कमिटी, विभाग अधिकारी, मध्यवर्ती कमिटी, शाखांचे कार्यकर्ते उपासक मोठया संख्येने उपस्थित होते, कार्यक्रमाच्या नियोजित रुपरेषेनुसार भव्यदिव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते परंतु ऐनवेळी पावसाची चिन्हे दिसू लागल्याने सदर मिरवणूक रद्द करण्यात आली, संध्याकाळच्या शेवटच्या सत्रात तालुक्यातील हौशी कलावंताचा नृत्याविष्कार, गितगायन, मुक्त कलाविष्कार कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

सरतेशेवटी सदर कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या आजी माजी कार्यकर्ते, विभाग अधिकारी, शाखा पदाधिकारी, मध्यवर्ती कमिटी, महिला मंडळ या सर्वांचे आभार मानून संघाचे कार्याध्यक्ष व कार्यक्रमाचे अध्यक्ष विश्वनाथ कदम यांनी कार्यक्रमाची सांगता केली.