“मला 50 लाख रुपये द्या, नाहीतर…”; मंत्री धनंजय मुंडेंना जीवे मारण्याची धमकी

0

मंत्री छगन भुजबळ यांच्यापाठोपाठ शिंदे-फडणवीस-पवार सरकारमधील आणखी एका मंत्र्याला जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. नवनिर्वाचित मंत्री धनंजय मुंडे यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. धनंजय मुंडे यांच्या परळीतील घरी धमकीचा फोन आला होता. मला 50 हजार रुपये द्या, नाहीतर मी तुम्हाला जीवे मारिन अशी धमकी फोन करणाऱ्या अज्ञात व्यक्तीनं दिल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून अज्ञात व्यक्तीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

मंत्री छगन भुजबळ काल पुण्यात असताना त्यांच्या कार्यकर्त्याच्या मोबाईलवर धमकीचा फोन आला. त्यापाठोपाठ मंत्री धनंजय मुंडे यांनाही धमकी देण्यात आली आहे. काल (सोमवारी) मध्यरात्री 12 वाजता एका अज्ञात व्यक्तीनं फोन करुन धनंजय मुंडे यांना जीवे मारण्याची धमकी दिली. मला पन्नास लाख रुपये द्या, नाहीतर मी धनंजय मुंडे यांना जीवे मारिन, अशी धमती फोनवरुन एका अज्ञात व्यक्तीनं दिली. धनंजय मुंडे यांच्या बीडमधील परळी येथील निवासस्थानी असलेल्या लँडलाईनवर धमकीचा फोन आला होता. या प्रकाराची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत, तपास सुरू केला आहे. याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे.

अधिक वाचा  राष्ट्रवादीकडून महापालिका निवडणुकांसाठी या नेत्यांची विभागनिहाय ‘निवडणूक प्रभारी’ म्हणून नियुक्ती जबाबदारी दिलेल्या नेत्यांची नावे जाहीर; सविस्तर वाचा!

ज्या व्यक्तीनं धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी फोन केला होता. त्यानं सांगितलं की, “मला धनंजय मुंडे यांना मारण्याची सुपारी देण्यात आली आहे. मला तुम्ही 50 लाख रुपये द्या, नाहीतर मी धनंजय मुंडेंना जीवे मारिन.” दरम्यान, असाच धमकीचा फोन मंत्री छनग भुजबळ यांनाही आला होता. त्यांच्या कार्यालयातील एका कार्यकर्त्यांच्या मोबाईलवर फोन करुन ही धमकी देण्यात आली आहे. धमकी देणाऱ्यानं छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची सुपारी मिळाल्याचं सांगितलं. दरम्यान, धमकी देणाऱ्याला पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. संबंधित व्यक्तीनं मद्यधुंद अवस्थेत धमकीचा फोन केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

अधिक वाचा  भाजपचा महाराष्ट्रभर झंझावात; पण येथे अख्ख्या पॅनलचं डिपॉझिट जप्त; पक्षाचा आलेला निधी देखील तळापर्यंत गेलाच नाही; प्रदेश पातळीवर मोठी खलबते होणार 

भुजबळांना धमकी देणारा अटकेत
छगन भुजबळ काल पुण्यात असताना त्यांच्या कार्यकर्त्याच्या मोबाईलवर फोन आला. फोन करणाऱ्या व्यक्तीनं मंत्री छगन भुजबळांना जीवे मारण्याची सुपारी मिळाल्याचं सांगितलं. धमकी देणाऱ्या व्यक्तीनं स्वतःचं नाव प्रशांत पाटील असल्याचं सांगितलं. त्यानंतर पोलिसांनी धमकी देणाऱ्याला अटक केली आहे.