वारजे आयडॉल २०२४ कराओके गायन स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा मोठ्या उत्साहात साजरा

0

वारजे आयडॅाल २०२४ कराओके गायन स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभ खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मा. भिमराव ( अण्णा ) तापकीर यांच्या शुभहस्ते पार पडला. या स्पर्धेस जवळपास २५० ऑनलाईन , ऑफलाईन नाव नोंदणी केलेल्या स्पर्धकांपैकी १५० स्पर्धकांनी प्रत्यक्ष स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला . यापैकी ३० स्पर्धकांनी उपांत्य फेरीत प्रवेश करून या ३० पैकी ७ क्रमांक या गायन स्पर्धेत काढण्यात आले आणि ४ उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात आली .

     यंदा प्रथमच आयोजन केलेल्या वारजे आयडॅाल २०२४ या कराओके गायन स्पर्धेचा प्रथम क्रमांकाच्या मानकरी अंजली पांगारे या गायिका ठरल्या . द्वितीय क्रमांक प्रिती वाटे , तृतीय क्रमांक करण गायकवाड , चतुर्थ क्रमांक साई तामकर , पाचवा क्रमांक सुगंध पंडित , सहावा क्रमांक मोनिका ओड , सातवा क्रमांक भीमा पंडित , अश्या स्पर्धकांनी आपल्या उत्कृष्ट गायनाने वारजे आयडॅाल २०२४ हा पुरस्कार पटकावला .

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

     या गायन स्पर्धेच्या बक्षीस समारंभास मा. आमदार भिमरावआण्णा तापकीर यांच्यासह गणेश वरपे अध्यक्ष खडकवासला , सचिन मोरे अध्यक्ष खडकवासला , मा. प्रभाकर भोरकडे जिल्हा परिषद सदस्य , नाट्य परिषदेचे खजिनदार अशोक जाधव , सुप्रसिद्ध गायक अनिल घाडगे , गायक संजय मरळ , स्वीकृत नगरसेवक संजय भोर , आकांक्षा नारी मंच अध्यक्ष मनीषा दांगट , खडकवासला अध्यक्ष भावना पाटील , राष्ट्रवादीचे देवेंद्र सूर्यवंशी , मा. रजनी पाचंगे , सुभाष अग्रवाल , चुनीलाल शर्मा , चेकमेट टाइम्सचे धनराज माने यांच्यासह संयोजन समितीचे फिल्म निर्माता राजीव पाटील , निवेदक अशोक उनकुले यांच्यासह स्पर्धक आणि कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते .

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

     वारजे आयडॅाल २०२४ या कराओके गायन स्पर्धेचे परिक्षक म्हणुन अशोक जाधव , संजय मरळ , जितेद्र भुरूक , अनिल घाटगे यांनी काम पाहिले . सुत्र संचालन अशोक ऊनकुले , चंद्रकांत पंडीत यांनी केले .

  या कार्यक्रमाचे संयोजन सचिन दशरथ दांगट स्वीकृत नगरसेवक यांनी केले होते .