राजू पारवेंच्या प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांनी शिंदेनी कंबर कसली, टपरीवर चहा, भर गर्दीत बाईक चालवली…

0

नागपूरच्या उमरेड परिसरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दुचाकीवरून प्रचार करतायेत.. राजू पारवे यांचा प्रचार मुख्यमंत्री करत आहेत. विदर्भातील कडक उन्हात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा रामटेकचे उमेदवार राजू पारवेंसाठी रोड शो करत आहे. उमरेडमध्ये रोड शोला कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. विदर्भातील 42 अंश सेल्सिअसच्या कडक उन्हात आज शेवटल्या टप्प्यातला प्रचार सुरु आहे .. या कडक उन्हात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रामटेकचे उमेदवार राजू पारवे यांच्यासाठी उमरेड येथे रोड शो करत आहे. रामटेकला आम्ही निवडून येणार असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्ती केला आहे.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

विदर्भात आज सायंकाळी 5 वाजता पहिल्या टप्प्यातील रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली व चंद्रपूर येथील लोकसभा निवडणुकीचा प्रचार संपणार आहे. सर्व उमेदवारांनी शेवटच्या दिवशी प्रचारात आपली टाकत झोकून दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रचाराच्या शेवटच्या दिवशी रामटेक मधील शिवसेनेचे उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचारासाठी उमरेड व हिंगणा येथे प्रचार रॅली घेत आहे.

विदर्भातील पाच जिल्ह्यांमध्ये शुक्रवारी मतदान पार पडणार

निवडणूक प्रचारासाठी मुख्यमंत्री नागपुरात दोन दिवस तळ ठोकून आहेत . रामटेक मधील शिवसेना उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचारासाठी नरखेड आणि सावनेर येथे विदर्भातील पाच जिल्ह्यांमध्ये शुक्रवारी मतदान पार पडणार आहे. आज प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उमरेडच्या मारवाडी राम मंदिरात दर्शन घेतलं.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

राजू पारवे हे लोकसभा निवडणुकीत रामटेकमधून महायुतीचे उमेदवार

काँग्रेसचे आमदार राजू पारवे यांनी आपल्या आमदाराकीचा राजीनामा देऊन एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. पक्षबदल करताच त्यांनी महाविकास आघाडीवर सडकून टीका केली आहे. राजू पारवे हे लोकसभा निवडणुकीत रामटेकमधून महायुतीचे उमेदवार आहे. त्यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री रस्त्यावर उतरले आहेत.

मतदारांचा नेमका कौल कोणाला?

नागपूर लोकसभा मतदारसंघात भाजपचे हेवीवेट नेते आणि महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि काँग्रेस नेते आमदार विकास ठाकरे यांच्यात चांगलाच सामना रंगतोय. सुरुवातीला एकतर्फी वाटणारी ही निवडणूक आता बऱ्यापैकी अटीतटीवर येऊन रंगातदार ठरलीय. या दोन्ही नेत्यांनी आपली संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. दोन्ही नेते तहान-भूक विसरून मिळेले त्या संधीचे सोने करत आपल्या प्रचाराला लागले आहेत.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार