मुंबईच्या या पठ्ठ्यामुळे ‘हार्दिक’ संघातूनच बाहेर? उपकरणदारपदी ‘वर्णी’ पण निवडीवर टांगती तलवार!

0

भारतात आयपीएल 2024 चा थरार रंगला आहे, परंतु सर्वांचे लक्ष यूएसए आणि वेस्ट इंडिजमध्ये जूनमध्ये होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कप 2024 वर आहे. दरम्यान मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याच्या अडचणी वाढलेल्या दिसत आहे. या आयपीएल हंगामात तो फारसा फॉर्ममध्ये दिसत नाही. ना तो फलंदाजीत चमत्कार कर आहे ना गोलंदाजीत.

आयपीएल सुरू होण्यापूर्वी बीसीसीआयने सांगितले होते की रोहित शर्मा कर्णधार असणार आहे आणि हार्दिक पांड्या उपकर्णधार असेल. पण हार्दिकची आयपीएलमधील कामगिरी पाहता उपकर्णधारपद सोडले तर त्याला संघात स्थान मिळणेही कठीण झाले आहे. भारताला मुंबईचा एक अष्टपैलू खेळाडू मिळाला आहे, जो हार्दिकपेक्षाही भारी आहे आणि तो या आयपीएलमध्ये चांगल्या फॉर्ममध्ये दिसत आहे.

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा, मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि संघ निवडकर्ता यांच्यात संघाबाबत चर्चा झाली. मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर, या बैठकीत हार्दिक पांड्याला संघात घ्यायचा की नाही याबद्दलही चर्चा झाली. जर हार्दिक पांड्याने आयपीएलच्या उर्वरित सामन्यांमध्ये चांगली गोलंदाजी केली नाही तर त्याला संघात स्थान मिळणार नाही, असे मानले जात आहे.
हार्दिकने आयपीएल 2024 च्या सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये गोलंदाजी केली होती, परंतु दोन्ही सामन्यांमध्ये तो वाईटरित्या फ्लॉप ठरला. यानंतर त्याने पुढील 3 सामन्यांमध्ये फक्त 1 षटक टाकले. याबाबत पांड्यावर प्रश्न उपस्थित केले जात होते.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

यानंतर हार्दिक पुढच्या सामन्यात चेन्नईविरुद्ध गोलंदाजी करायला आला, पण या सामन्यातही तो फ्लॉप ठरला. हा खराब फॉर्म पाहता पांड्याला वर्ल्ड कप संघातून वगळले जाऊ शकते, असे बोलले जात आहे. त्याच्या जागी चेन्नई सुपर किंग्जकडून खेळणाऱ्या अष्टपैलू शिवम दुबेचा संघात समावेश करण्यात आला आहे.
शिवम जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहे. गरज पडल्यास तो गोलंदाजीनेही संघाला साथ देऊ शकतो. अशा परिस्थितीत शिवमने या शर्यतीत हार्दिक पांड्याला मागे टाकल्याचे मानले जात आहे. पांड्याने उर्वरित सामन्यांमध्ये चांगली गोलंदाजी केल्यास त्याचा संघात समावेश केला जाऊ शकतो, अन्यथा त्याच्या जागी शिवम दुबेला खेळवले जाऊ शकते.

अधिक वाचा  कोथरूडला ऐन दिवाळीत ‘तात्काळ’ कारवाई धडाका?; भाजपाची एक तक्रार अन् पालिका प्रशासन तडफदार

हार्दिक पांड्या या मोसमात आतापर्यंत एकूण 6 सामने खेळला आहे. या 6 सामन्यांमध्ये त्याने 145 च्या स्ट्राईक रेटने केवळ 131 धावा केल्या आहेत. याशिवाय गोलंदाजीतही त्याने केवळ 3 बळी घेतले आहेत.
दुसरीकडे, शिवम दुबे जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. दुबेने आतापर्यंत खेळलेल्या 6 सामन्यात 2 अर्धशतकांच्या मदतीने 242 धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे त्याने 163 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत. यावरून अष्टपैलू खेळाडूच्या शर्यतीत शिवम दुबे हा हार्दिकपेक्षा खूप पुढे असल्याचे स्पष्ट झाले आहे.