पत्नी पूजा तडस यांचे गंभीर आरोप, बाळ कुणाचं, DNA टेस्टची मागणी का? पंकज तडस म्हणाले…

0
2

रामदास तडस यांच्या सुनेनं त्यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबीयांवर गंभीर आरोप केले आहेत. तडस कुटुंबीयांनी माझा प्रचंड मानसिक छळ केला आहे, माझ्या बाळाच्या डीएनए चाचणीची मागणी देखील ते करतात असा आरोप पूजा तडस यांनी केला आहे. तर दुसरीकडे पूजा यांचे पती आणि रामदास तडस यांचे पुत्र पंकज तडस यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत. मला हनीट्रॅप करण्याचा प्रयत्न होतोय, पूजा आणि माझ्या सहा केसेस कोर्टात आहेत, असं पंकज तडस म्हणाले.

बाळाच्या डीएनए चाचणीवर प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने उत्तर देण्यास पंकज तडस यांनी नकार दिला आहे. पंकज तडस म्हणाले, विरोधकांना सोबत घेऊनसुरू असलेला सुनियोजीत प्लान आहे. लोकसभेत उभे राहायचे तर लोकसभेला उभे राहण्यासाठी, प्रसिद्धी मिळवण्यासाठी पैसा कुठून येतो? यामध्ये दोन मोठ्या राजकरणी सहभागी आहेत. रामदास तडस यांचे तिकीट कापण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. माझ्याकडे या संदर्भात पुरावे आहे. 2019 आणि 2024 साली देखील हे प्रयत्न केला आहे. विरोधकाचे षडयंत्र असून विरोधकच सगळा मालमसाला पुरवत आहे.आमची तिकीट कसा कापले जाईल यासाठी प्रयत्न सुरु आहेत. शंभर टक्के विरोधकांचा राजकीय डाव आहे.

अधिक वाचा  राज्यव्यापी OBC नेते आक्रमक थेट मराठा आरक्षणाचा शासन निर्णय फाडला, राज्यव्यापी आंदोलनही करणार 

अन्यायाला वाचा फोडण्यासाठी हाच कालावधी का निवडला?
: पंकज तडस

अन्यायाला वाचा फोडण्यासाठी, आरोप करण्यासाठी हाच कालावधी का निवडला? अशी शंका पंकज तडस यांनी उपस्थित केली. अन्याय झाला असेल तर कोर्टात न्याय मागावा. पुजा कोर्टात येत नाही आणि बाहेर आरोप करतात. ज्या महिलेला संसार करायचा ती महिला तमाशा करणार नाहीत, असे देखील तडस यावेळी म्हणाले. माझा विवाह रद्द करा अशी मागणी आम्ही कोर्टात केली आहे. तसेच पुजा यांच्या विरोधात मी खंडणीची देखली तक्रार पोलीस ठाण्यात केली आहे आणि तसे पुरावे मी पोलीस ठाण्यात दिले आहे . हा सर्व हनी ट्रॅपचा प्रयत्न आहे. माझ्या परिवाराला फसवण्याचा हा प्रयत्न आहे, असे देखील पंकज तडस म्हणाले.

अधिक वाचा  कोथरूड सर्वपक्षीय गणेश विसर्जन नियोजन समिती; 17वा विसर्जन नियोजन महोत्सव…तोच उत्साह …तोच ध्यास!

विरोधकाचे षडयंत्र असून परिवाराला बदनाम करण्याचा डाव : पंकज तडस

मोदींकडे जाण्याचा आणि न्याय मागण्याचा अधिकार सर्वांना आहे. मोदींकडे जरी पुजा गेल्या तरी खंडणी प्रकाराच्या 10 हजार कागदपत्रांचा पुरावा आणि दोन हजार ऑडिओ क्लिप मोदींकडे देण्यास तयार आहे. माझ्याकडे फॉरेन्सिक लॅबचे रिपोर्ट आहे. हा हनीट्रॅपचा प्रयत्न आहे. हनी ट्रॅपच्या 2000 ऑडिओ क्लिप आहेत. विरोधकांचा आधार घेत प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न आहे.