वर्ध्याचे भाजपा उमेदवार रामदास तडस यांच्यावर सूनेचे गंभीर आरोप, ज्या फ्लॅटवर मला ठेवलं, तिथे….

0

वर्ध्यातील भाजप खासदार रामदास तडस यांच्या सून पूजा तडस यांनी आज शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यासमवेत पत्रकार परिषद घेत अत्यंत गंभीर आरोप करताना थेट पीएम मोदींकडे याचना केली आहे. मुलाचा डीएनए टेस्ट करण्याची मागणी केल्याचा गंभीर आरोप सुद्धा पूजा तडस यांनी केला. पूजा तडस यांनी वर्ध्यामध्ये अपक्ष अर्ज भरला असून त्या रामदास तडस यांच्याविरोधात रिंगणात आहेत.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन

त्यांनी सांगितले की, पूजा तडस यांच्या संवेदना समजूनच मी इथं आली आहे. हा मुद्दा पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन उचलत आहे. एक परिवार उद्ध्वस्त होत असून तो परिवार मोदींच्या परिवारातील परिवार आहे. म्हणून मोदी 20 तारखेला त्याच उमेदवाराच्या प्रचाराला येत असतील, तर त्यांनी आधी त्या उमेदवाराचा परिवार सुरक्षित आहे का? हे पाहायला पाहिजे, मग भाषणबाजी केली पाहिजे, असा टोला लगावला.