कॅप्टन हार्दिक पंड्याला जबरदस्त फटका, मॅचविनर खेळाडू आणखी सामन्यांना मुकणार

0
32

हार्दिक पंड्या याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सची आयपीएलच्या 17 व्या हंगामातील सुरुवात निराशाजनक झाली. मुंबईला हंगामातील पहिले 2 सामने गमवावे लागले. मुंबईला पहिल्या सामन्यात गुजरातने पराभवाची धुळ चारली. तर त्यानंतर दुसऱ्या सामन्यात सनराजयर्स हैदराबादने धुव्वा उडवला. सलग दुसऱ्या पराभवानंतर मुंबईचं टेन्शन दुप्पटीने वाढवणारी वाईट बातमी समोर आली आहे. मुंबईचा मॅचविनर बॅट्समन सूर्यकुमार यादव पुढील आणखी काही सामन्यांना मुकणार आहे. त्यामुळे मुंबईला मोठा झटका लागला आहे

मुंबईला मोठा धक्का

जगातील नंबर 1 बॅट्समन सूर्यकुमार यादव याच्यावर काही महिन्यांपूर्वी शस्त्रक्रिया पार पडली. मात्र सूर्या यातून अजूनही सावरलेला नाही. त्यामुळे सूर्याला पुढील आणखी काही सामन्यांना मुकावं लागणार आहे. सूर्याला आयपीएलच्या 17 व्या हंगामातील पहिल्या 2 सामन्यांमध्येही खेळता आलं नाही. सूर्यकुमारवर एनसीए अर्थात नॅशनल क्रिकेट अकादमीत तज्ज्ञ लक्ष ठेवून आहेत.

अधिक वाचा  मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतलं मराठे पुन्हा तहात हरले? शासन निर्णयावर कोण कोण काय म्हणालं?

सूर्यकुमार यादव याला दक्षिण आफ्रिका दौऱ्यात दुखापत झाली होती. टीम इंडिया नोव्हेंबर 2023 मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर होती. सूर्याला दुखापतीनंतर नोव्हेंबरपासून एकही सामना खेळता आलेला नाही. सूर्यकुमार क्रिकेटच्या मैदानापासून गेली 4 महिने दूर आहे. त्यामुळे टीम इंडियालाही मोठा फटका सहन करावा लागला. तर आता मुंबईचं टेन्शन वाढलंय. सूर्या मॅचविनर फलंदाज आहे. त्याने मुंबईला अनेक अशक्य असे विजय मिळवून दिले आहेत. त्यामुळे सूर्याचं नसणं मुंबईसाठी किती नुकसानकारक आहे, याचा अंदाज येतो. सूर्या लवकरात लवकरत दुखापतीतून बरा होऊन टीममध्ये परतावा, अशी इच्छा प्रत्येक मुंबईच्या चाहत्याची असणार आहे.

अधिक वाचा  पुण्यात १४ वर्षात नदीची वहन क्षमता घटल्याने पुराचा धोका ४०% नी वाढला

सूर्यकुमार यादव याला आणखी वेटिंग करावं लागणार

मुंबई इंडियन्स : हार्दिक पंड्या (कॅप्टन), रोहित शर्मा, ईशान किशन (विकेटकीपर), डेवाल्ड ब्रेव्हिस, तिलक वर्मा, टीम डेव्हिड, शम्स मुलानी, जेराल्ड कोएत्झी, पीयूष चावला, जसप्रीत बुमराह, ल्यूक वुड, नमन धीर, रोमॅरियो शेफर्ड, मोहम्मद नबी, श्रेयस गोपाल, विष्णू विनोद, अर्जुन तेंडुलकर, नेहल वढेरा, कुमार कार्तिकेय, शिवालिक शर्मा, अंशुल कंबोज, आकाश मढवाल, नुवान तुषारा आणि क्वेना मफाका.