कोलवडी-साष्टे येथील विविध विकासकामांचे भूमिपूजन

0

हवेली : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्हा पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून आणि पुणे जिल्हा नियोजन समिती फंडातून कोलवडी-साष्टे येथील विविध विकास कामासाठी ९१ लक्ष रु निधी मंजूर करण्यात आला. पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य तथा हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अध्यक्ष दिलीप नारायणराव वाल्हेकर यांच्या पुढाकाराने अनेक विकास कामांना मंजुरी मिळाली आहे.

कोलवडी – साष्टे ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमात पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य दिलीप नारायणराव वाल्हेकर आणि लोकनियुक्त सरपंच विनायक गायकवाड यांच्या शुभहस्ते विविध विकास कामाचे भूमिपूजन शुभारंभ संपन्न झाला. यावेळी बोलताना लोकनियुक्त सरपंच विनायक गायकवाड म्हणाले, कोलवडी – साष्टे गावात आत्ता विकासाचे अजित पर्व सुरू झाले आहे. निवडणूकीत कोलवडीकर आणि साष्टेकरांना माझ्यासह आमच्यावर जो विश्वास दाखवला तो सार्थ करण्यासाठी आम्ही सर्वजण अहोरात्र कार्यरत आहोत. आम्ही गावकऱ्यांना जो शब्द आणि वचन दिले ते विकासात्मक कार्यातून पूर्ण करण्याची ही सुरुवात आहे. आगामी काळात केंद्र – राज्य सरकार च्या विविध योजना राबविण्यामध्ये आपली कोलवडी – साष्टे ग्रामपंचायत ही अग्रस्थानी असणार आहे. आत्ता जनसुविधा योजनेअंतर्गत कोलवडी स्मशानभुमी घाट सुधारणासाठी दहा लाख, ३०५४ अंतर्गत कोलवडी येथे साष्टे ते भोरवस्ती ग्रा. मा. ७५ रस्ता करणे २० लक्ष, कोलवडी ग्रा.मा. ८५ ते भालसिंगवस्ती ग्रा. मा. ८३ रस्ता करणे ३० लक्ष, कोलवडी खंडोबा मंदिर ते भालसिंग वस्ती रस्ता करणे २५ लक्ष आणि महावितरण योजनेअंतर्गत साष्टे मोरे वस्ती येथे नविन ट्रान्सफॉमर बसविण्यासाठी ०६ लक्ष रूपये असा ९१ लक्ष निधि मंजूर करून विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आल्याचे लोकनियुक्त सरपंच विनायक गायकवाड यांनी सांगितले. यावेळी पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य दिलीप नारायणराव वाल्हेकर यांनी आगामी काळात कोलवडी – साष्टे ग्रामपंचायतला सर्वांगिण विकासासाठी लागणारे सर्वोतोपरी सहकार्य करणार असल्याचे सांगितले.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा

यावेळी कु.कुशाल सातव, सौ. चारुशीला कांचन, सौ. उत्कर्षा गोते, कु. जयश कंद, गणेश शेलार, कोलवडी – साष्टे उपसरपंच सौ. शीतल अविनाश भाडळे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी आणि समस्त ग्रामस्थ कोलवडी – साष्टे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सोबत: विविध विकास कामांचे भूमिपूजन शुभारंभ प्रसंगी उपस्थित मान्यवर फोटो