पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमारांची बदली; ‘हे’ नवे आयुक्त असणार; लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर बदल?

0
29

पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची बदली झाली असून त्यांच्या जागी आयएएस अधिकारी राजेंद्र भोसले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हा बदल झाल्यानं त्याची चर्चा सुरु झाली आहे.

विक्रम कुमार यांची मुंबई एमएमआरडी विभागात बदली करण्यात आली आहे. महापालिकेच्या निवडणुका अद्याप प्रलंबित असल्यानं गेल्या दोन वर्षांपासून विक्रम कुमार हे प्रशासक म्हणून भूमिका बजावत होते. महापालिका आयुक्त आणि प्रशासक म्हणून विक्रम कुमार हे गेल्या पावणेचार वर्षांपासून पुणे महापालिकेचं कामकाज पाहिलं. या काळात पालिकेत नगरसेवक नसल्यानं त्यांनी कुठलेही धोरणात्मक निर्णय घेतले नाहीत. आता त्यांच्या जागी राजेंद्र भोसले हे प्रशासकाची भूमिका बजावणार आहेत. त्यांना नागरी प्रशासन हाताळण्याचा चांगला अनुभव आहे.

अधिक वाचा  ओबीसींसाठी उपसमिती गठीत, चंद्रशेखर बावनकुळे अध्यक्ष छगन भुजबळ, पंकजा मुंडेंसह बडे मंत्री सदस्य

या दोन अधिकाऱ्यांबरोबरच आएएस अधिकारी लहू माळी यांची देखील बदली करण्यात आली असून आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या संचालकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मंत्रालयातील मदत आणि पुनर्वसन विभागात ते काम करणार आहेत.

तसेच मुंबईतील कापूस उत्पादक पणन महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम पाहणारे आयएएस अधिकारी कैलाश पगारे यांची नवी मुंबईच्या एकात्मिक आदिवासी विकास योजना विभागात आयुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे.