लोकसभा निवडणुक कोणत्याहीक्षणी लागण्याची शक्यता आहे. या निवडणुकीसाठी सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागांसाठी निवडणूक होणार आहे. या 48 जागांपैकी 28 जागा महायुतीला जिंकता येणार आहेत. खरं तर महायुतीने 45 जागा जिंकण्याचे लक्ष ठेवले आहे. पण त्यांना 28 जागांवरच समाधान मानावे लागणार आहे. त्यामुळे महायुतीसाठी हा मोठा धक्का असणार आहे. तर महाविकास आघाडीला 20 जागा जिंकता येणार आहेत.






एबीपी माझा आणि सी वोटर सर्व्हेचा ओपिनियन पोलसमोर आला आहे. या सर्व्हेनुसार, आगामी लोकसभा निवडणूकीत भाजपला 22 जागा जिंकता येणार आहेत. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एकत्र मिळून 6 जागाच जिंकता येणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी महायुतीला केवळ 28 जागा जिंकता येणार आहेत. खरं तर महायुतीने लोकसभा निवडणुकीत 45 जागा जिंकण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे. मात्र या सर्व्हेनुसार महायुतीला हे लक्ष्य गाठता येत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे महायुतीला हा मोठा झटका आहे.
महाविकास आघाडी बद्दल बोलायचं झालं तर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला एकत्रित मिळून 16 जागा जिंकण्याचा अंदाज आहे. तर काँग्रेसला 6 जागा जिंकता येणार आहेत. त्यामुळे एकूण महाविकास आघाडीला 22 जागाच जिंकता येणार आहेत.
ओपिनियन पोलचे आकडे
एनडीए : 28
एमवीए : 20
महायुती
भाजप : 22
शिंदे-अजित पवार : 06
महाविकास आघाडी
शरद पवार- उद्धव ठाकरे: 16
काँग्रेस : 06
ओपिनियन पोलनुसार मतांच्या टक्केवारीबद्दल बोलायचं झालं तर, लोकसभा निवडणुकीत भापज प्रणित एनडीएला 42.7 टक्के मतं मिळतील. दरम्यान 2019 च्या लोकसभा निवडणुकीत एनडीएला एकूण 50.88 टक्के मतं मिळाली होती. महाराष्ट्रात त्यावेळेस भाजप आणि शिवसेनेच्या युतीला मिळालेली ही मतं आहेत. पण 2024 च्या निवडणुकीत एनडीएच्या मतांच्या टक्केवारीत 8 टक्क्यांनी घट होण्याचा अंदाज आहे.
2019 मध्ये युपीए आघाडीला 32.24 टक्के मतं मिळाली होती. मात्र आता शरद पवार गट आणि ठाकरे गटाच्या प्रवेशानंतर इंडिया आघाडीला यंदाच्या लोकसभा निवडणुकीत 42.1 टक्के मतं मिळतील,असा अंदाज आहे. तर इतर पक्षांना या निवडणुकीत 15.1 टक्के मतं मिळतील.












