श्री शनि मारुती बाल गणेश मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून आयसर कंपनी गुळवणी महाराज रोड एरंडवणे येथे सामाजिक हेतूने सुरू करण्यात आलेले वाचनालय मध्यरात्री एका उद्धट आणि आर्थिक लागेबांधे सांभाळणाऱ्या अधिकाऱ्याने अघोरी कारवाई केली तसेच संबंधित मंडळाच्या कार्यकर्त्याला अमानुषपणे मारहाण केल्यामुळे संबंधित अतिक्रमण विभागाचे उमेश नरूले यांना तात्काळ निलंबित करावी अशी मागणी एरंडवणे भागातील सर्वपक्षीय नेत्यांच्या मार्फत सहाय्यक आयुक्त पुणे महानगरपालिका विजय नाईकल यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.






ज्या ठिकाणी कचरा दारूच्या बाटल्या टाकल्या जायच्या. त्या ठिकाणी मंडळाने गेली वर्षभर रोज रात्री थांबून लोकांना विनंती केली येथे कचरा टाकू नका. तिथे झालेल्या कचरापेटीचे रूपांतर एक छोट्याशा वाचनालय मध्ये केले व पुणे महापालिकेच्या आरोग्य खात्यावरचा भार कमी झाला अतिशय चांगल्या प्रकारे झालेल्या त्या त्या कामाचं लोकांनी भरभरून कौतुकही केले. तिथून जाणारा वाटसरू तिथं सावली बघून थांबत होता. आजूबाजूच्या वृद्ध लोक त्याचा संध्याकाळच्या वेळेस बसण्यासाठी चांगला उपभोग होत होता. अशा या समाजोपयोगी कामाचं कौतुक करणे ऐवजी अतिक्रमण विभागाने एका क्षणात जमीन दोस्त केले. कोणी तुमच्या अतिक्रमण खात्याला तक्रार केली असेल. तर तुम्ही त्या कामाची शहानिशा करावी ते काम कशासाठी झाले होते नंतर त्याच्यावरही कारवाई करावी ही अपेक्षा.
आज श्री शनि मारुती बाल गणेश मंडळ तुमच्या महापालिकेच्या प्रत्येक कामासाठी अग्रेसर असते. कोणी एका विघ्न संतोषी माणसाच्या तक्रारीमुळे एखादे चांगले झालेले काम क्षणात उध्वस्त होते याची तुम्ही दखल घ्यावी. असे जर झाले तर भावी काळामध्ये असे चांगलं काम करण्यासाठी पुढे येणार नाही. आपलं वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालय आज स्वच्छतेचे बाबतीत एक नंबरला आहे. आणि तेच एक नंबरला राहावं याच्यासाठी आमची गणेश मंडळ प्रयत्न करत असतात तरीसुद्धा तुम्ही गणेश मंडळांच्या कामावर घाला घालणं ही शोकांतिका आहे. संबंधित अधिकाऱ्यावरती दोन दिवसात कारवाई करण्यात आली नाही तर पुन्हा उग्र आंदोलन करण्याचा इशारा सर्वपक्षीय नेत्यांकडून देण्यात आला आहे.
पुणे महापालिकेकडूनही चोख तयारी
श्री शनि मारुती बाल गणेश मंडळ येथील कार्यकर्त्यांना मारहाण केल्या नंतर पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून संबंधित प्रकरण तापण्याची शक्यता लक्षात घेऊन आपल्या रात्रीच या कार्यकर्त्यावर शासकीय कामात अडथळा आणल्याच्या कारणास्तव अलंकार पोलीस स्टेशन येथे अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित प्रकरणाबाबत सहाय्यक आयुक्त कार्यालय यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी योग्य ती कारवाई केल्या करणार असल्याचे आश्वासन दिले असले तरी अतिक्रम विभागाच्या वतीने दाखल करण्यात आलेला गुन्हा हे प्रकरण वाढण्याची शक्यता दर्शवत आहे.










