विजयानंतर धंगेकर यांच्या पत्नींची पहिली प्रतिक्रिया म्हणाल्या शरद पवार यांनी दिलेला ‘तो’ आशिर्वाद झाला खरा

0
3

पुणे : पुण्याच्या कसबा पोटनिवडणुकीचा निकाल लागला असून काँग्रेसच्या रविंद्र धंगेकर यांनी विजय मिळवला आहे. 28 वर्षे भाजपचा बालकिल्ला राहिलेल्या कसबा मतदारसंघात सत्तांतर झालं आहे. रविंद्र धंगेकर यांना एकूण 73 हजार 194 इतकी मते मिळाली असून त्यांनी 11 हजार 40 मतांनी विजय मिळवला आहे. विजयानंतर पहिली प्रतिक्रिया देताना हा विजय जनतेचा असून मी केलेल्या 30 वर्ष सातत्याने केलेल्या कामाचा विजय असल्याचं रविंद्र धंगेकर म्हणाले. तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलेला आशिर्वाद खरा झाल्याची प्रतिक्रिया धंगेकर यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर यांनी दिली.

अधिक वाचा  रुणवाल पॅनोरमा सोसायटीत श्रीचरणी कामगार कवी राजेंद्र वाघ यांच्या कविता सादर 

रविंद्र धंगेकर यांचा अभिमान वाटत असून बहुमतांनी आमचा विजय झाला आहे. शरद पवार यांनी यशस्वी होण्याचा दिलेला आशिर्वाद खरा झाला आहे. मागील पराभवानंतर त्यांनी मी नक्की निवडून येईल असं सांगितलं होतं. मनात कोणतीही धाकधूक नव्हती आणि महाविकास आघाडीने दाखवलेला विश्वास सार्थ ठरला असल्याचं प्रतिभा धंगेकर यांनी सांगितलं आहे.
भाजपने प्रचंड ताकद लावलेली होती आणि प्रतिष्ठेची लढत होती पण त्याचा काही उपयोग झाला नाही. या विजयाचं श्रेय महाविकास आघाडी आणि कसब्यातील जनतेला देणार आहे. भाजपचा गड कधी नव्हताच त्यांनी हा फुगवलेला फुगा होता तो आता फुटला आहे. मोठ्या मतांनी विजय मिळेल अशी अपेक्षा होती, असं प्रतिभा धंगेकर म्हणाल्या.
जनतेने ठरवलं होतं रविंद्र धंगेकरला विधानसभेत पाठवायचं. त्यामुळे पैशांचा पाऊस पडला असला तरी मतांचाही पाऊस पडला असून जनतेने पैशाला भीक घातली नसल्याचं रविंद्र धंगेकर म्हणाले. माझ्या विजयाचं श्रेय जनतेला आणि मतदारराजाला देणार असल्याचंही धंगेकर यांनी म्हटलं असून हा विजय महाविकास आघाडीचा आहे, असं धंगेकर म्हणाले.

अधिक वाचा  सत्येच्या केंद्रस्थानी कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी शिवसेनेशी युती; मा. आनंदराज आंबेडकरांची भूमिका स्पष्ट झाली

दरम्यान, काँग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर हे विजयी झाले आहे. 28 वर्षांनी भाजपचा मोठा पराभव झाला आहे. रविंद्र धंगेकर यांचा 11 हजार 40 मतांनी विजय झाला असून भाजपला हा मोठा धक्का बसला आहे. गिरीश बापट ( Girish Bapat ) यांचे नेहमीच वर्चस्व असलेल्या मतदार संघात भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांना पराभाव स्वीकारावा लागलाय.