‘माझा जन्मच बंगल्यामध्ये समजनेवाले को इशारा…’ ; नाव न घेता हर्षवर्धन पाटील यांना आमदार भरणेमामांचा इशारा

0

‘भरणे कुटुंब दिवंगत शंकरराव (भाऊ) पाटील यांना मानणारे कुटुंब आहे. भाऊंच्या सांगण्यावरुन 15 ते 20 वर्षापूर्वी इंदापूर सहकारी साखर कारखान्यातील (कर्मयोगी साखर कारखाना) कामगारांच्या पगारासाठी भरणे कुटुंबाने इंदापूर बँकेमध्ये 4 ते 4.5 कोटी रुपयांची ठेव ठेवली होती. कारखाना उभारणी करीत असताना सुरुवातीला कागदपत्रासाठी 3 लाख रुपयांची गरज असताना भरणे कुंटूबाने 1 लाख रुपये दिले होते.’ ‘माझा जन्मच बंगल्यामध्ये झाला असून पहिली अलिशान गाडी भरणे कुंटुंबाकडे होती व आजही आहे. मला कोणावरती टीका करायची नसून समजनेवाले को इशारा ही काफी होता है.’ असे सांगून आमदार दत्तात्रय भरणे यांनी हर्षवर्धन पाटील यांचे नाव न घेता त्यांना इशारा दिल्याचे दिसून आले.

अधिक वाचा  पुणेकरांनो, उन्हाचा चटका आणखी वाढणार! मंगळवारपासून कमाल तापमान ३६ अंशांवर जाण्याचा अंदाज

सन 1992 साली, 1995 साली कोणाची काय परस्थिती होती. याविषयी मला काही बोलायचे नाही. आम्हाला ही आरोप करता येतात. उगाच खोटे- नाटे आरोप करणार असाल तर ते चुकीचे असल्याचे सांगून समजनेवाले को इशारा काफी होता है. असे भरणे यांनी म्हटले.

सध्या इंदापूर तालुक्यामध्ये लोकसभेच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. भाजपच्या वतीने जिल्हा परिषद गटामध्ये संकल्प 2024, संकल्प विजयाचाचे मेळावे सुरु आहेत. भाजपच्या मेळाव्यामध्ये आमदार दत्तात्रय भरणे यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला जात आहे. तर भाजप व राष्ट्रवादीच्या काँग्रेस पक्षाच्या युतीचा धर्म असल्यामुळे अजित पवार यांच्या सुचनेमुळे राष्ट्रवादीचे नेते,पदाधिकारी गप्प असल्याचे दिसत असून भरणे यांनी मात्र टीका न करता अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.

अधिक वाचा  केंद्र सरकारचा मोठा निर्णय निर्बंध हटवले, चांदी स्वस्त होणार… सहा महिन्यांसाठी 6500 मेट्रिक टन चांदी आयातीला मंजुरी

आम्हाला आमच्या पक्षश्रेष्ठींचा आदेश मान्य आहे. लाेकसभा-विधानसभा निवडणूकीमध्ये पक्षश्रेष्ठी जो निर्णय देतील त्यानुसार आम्ही काम करणार आहोत. उगाच आत्तापासुन आरोप-प्रत्यारोप करुन काही उपयोग होणार नाही. उगाव काव -काव, चाव-चाव करुन उपयोग होणार नसल्याचे भरणे यांनी सांगितले.

यावेळी तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे यांनी सांगितले की, मी कोणाला घाबरत नाही.सर्व पक्षांची युती झाली आहे. नेत्यांचा आदेश असून कुणावरती टीका टिपणी करु नका. मी आदेशामुळे टीका करणार नाही. 2019 विधानसभा निवडणूकीमध्ये आमदार दत्तात्रय भरणे 3200 मतांनी विजयी झाले होते. मात्र 2024 च्या निवडणूकीमध्ये विकासकामांच्या जोरावर ३२ हजार मतांनी निवडून येणार असल्याचे कोकाटे यांनी सांगितले.

अधिक वाचा  पुणे विधानपरिषद आमचे दोन्हीही उमेदवार उच्चशिक्षित मोठ्या फरकाने विजयी होणार; गोकुळवरून चंद्रकांत पाटलांनी ट्रोलर्संनाही सुनावलं