महापुरुषांच्या नावाने गरळ ओकणाऱ्या संभाजी भिडेवर कारवाई करा माजी राज्यमंत्री शिवरकर

0

पुणे:  महात्मा गांधी, महात्मा फुले या महापुरुषांच्या नावाने गरळ ओकून समाजाच्या भावना दुखावणाऱ्या संभाजी भिडेवर शासन आणि प्रशासनाने कायदेशीर कारवाई करून अटक केली पाहिजे, अशी मागणी माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांनी केली.

यावेळी समाजवादीचे नेते प्रा. सुभाष वारे म्हणाले की, संभाजी भिडे नामक व्यक्ती महापुरुषांची बदनामीची वक्तव्य करीत आहे. प्रशासनाकडून कारवाई केली जात नाही, त्यामुळे त्यांची भीड चेपत चालली आहे. समाजामध्ये आक्रोश, संताप आहे, त्यामुळे भिडेंवर कारवाई करून अटक केली पाहिजे, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली.

महापुरुषांची बदनामी करणाऱ्या संभाजी भिडे ऊर्फ मनोहर कुलकर्णी यांच्यावर गुन्हे दाखल करून अटक करावी, अशा मागणीचे निवेदन सर्व पक्षीयांच्या वतीने हडपसर पोलीस स्टेशनला देण्यात आले. याप्रसंगी माजी नगरसेवक योगेश ससाणे, सुनील बनकर,विठ्ठल सातव ,मुकेश वाडकर ,प्रशांत सुरसे, संजय शिंदे, नितीन आरू, महेंद्र बनकर, दीपक इसावे, सतीश आल्हाट, राजेंद्र नेवसे, शिवकुमनार मोळकरी, भागवत काळे, महेश ससाणे, राजू शिंदे, सुभाष रायकर, प्रा. शोएब इनामदार, सविता बोराटे, साधना शिंदे, विवेक तुपे, शीतल शिंदे, मंगेश रायकर, उज्ज्वला जगताप, दीपाली माटे, आशाताई पाळेकर,तुषार हिगणे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता

हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके म्हणाले की, भिडे गुरुजींनी केलेल्या वक्तव्यामुळे समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. समाजाच्या भावना शासन दरबारी मांडून योग्य ती कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, गौरी पिंगळे, दीपाली माटे, सुनीता भगत, प्रा. विद्या होडे, रोहिणी भोसले म्हणाल्या की, संभाजी भिडे यांचा उल्लेख मनोहर भिडे असा करा, महापुरुष सर्व समाजाचे आहेत, त्यांची बदनामी सहन करणार नाही. संभाजी भिडेची गाढवावर बसवून चप्पलचा हार घालून पुण्यात धिंड काढली पाहिजे, अशा तीव्र भावना महिलांनी व्यक्त केला.