जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिवसानिमित्त ‘नशा मुक्ती’ जनजागृती अभियान!

0

कोथरूड बावधन व वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालय आरोग्य विभाग, पुणे शहर पोलीस आयुक्तालय अलंकार पोलीस ठाणे, इंडियन रेड क्रॉस सोसायटी, मामासाहेब मोहोळ महाविद्यालय, गरवारे महाविद्यालय, नेहरू युवा, सरस्वती विद्या मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने ” जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन व स्वच्छ भारत अभियान व स्वच्छ सर्वेक्षण मिशन – २०२३” अनुषंगाने नशा मुक्ती जनजागृती अभियान सत्कार फेरी” दि. ८/७/२०२३ रोजी आयोजित करण्यात आली होती.

सदर कार्यक्रम डहाणूकर कॉलनी येथील किर्लोस्कर कमिन्स एम्प्लॉईज युनियनच्या कार्यालयात २०० शालेय व महाविद्यालयीन युवकांच्या उपस्थितीमध्ये नशा मुक्ती विषयी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश तटकरे तसेच वारजे कर्वेनगरच्या ब्रँड अँबेसिडर रूपाली मगर व कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालयाचे ब्रँड अँबेसिडर व मोकादम वैजीनाथ गायकवाड तसेच शिक्षक कैलास सरतापे यांनी नशा मुक्ती विषयी महाविद्यालयीन तरुणांना मार्गदर्शन केले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश तटकरे मार्गदर्शन करत असताना असे म्हटले की,” शालेय व महाविद्यालयीन तरुणांनी अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्ताने विडी, सिगारेट, दारू, कोकेन, पिणार नाही व अन्य मी कोणत्याही प्रकारची शरीराला घातक अशा नशा करणार नाही व इतरानाही करू देणार नाही अशी शपथ घेण्याचे आवाहन केले.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

मुकादम वैजीनाथ गायकवाड यांनी असे म्हटले की, “भारत देशातील तरुण वर्गात नशा करण्याच्या सवयी मध्ये वाढ झाल्यामुळे ३७% टक्के तरुण वयाच्या ४५ वर्षाच्या आतच मृत्युमुखी पडतात. हे मृत्यूचे प्रमाण पहाता अतिशय दुःखदायक व वेदनादायक घटना मानावी लागेल. यामुळे अनेकांचे संसार उध्वस्त होत आहेत. जर आजच्या तरुण तरुणीने सरकारवर दबाव आणून संपूर्ण देशात नशा खोरीचे जे उत्पादन आहे ते बंद करा म्हणून सामाजिक चळवळ उभी करणे गरजेचे आहे. त्याशिवाय समाजामध्ये स्त्रीया व मुलींवर होणारे अन्याय अत्याचार, जातीय दंगली, सार्वजनिक मालतमतेचे नुकसान होणार नाही. भारत देशाला जागतिक महासत्ता म्हणून उदयास आणायचे असेल तर तर तरुणांनी निर्व्यसनी राहून आपले जीवन घडवणे आवश्यक आहे.” तसेच चार्लीच्या भूमीकेतून जेष्ठ कलाकारानी पथनाटय व गायनाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. तसेच गोवा गुटखा खाऊ नका, आपले आरोग्य धोक्यात आणू नका, सार्वजनिक ठिकाणी थुंकून परिसर घाण करू नका, अशा घोषणाही देण्यात आल्या.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

तद्नंतर नशा मुक्ती जनजागृती अभियान प्रचार फेरी डहाणूकर कॉलनी, लक्ष्मी नगर, हॅपी कॉलनी, कोथरूड गांवठाण, गोसावी वस्ती परिसरात काढण्यात आली. सदर अभियान महापालिका सहाय्यक आयुक्त केदार वझे, राजेश गुर्रम, पोलीस उपायुक्त सुहेल शर्मा, सह पोलीस आयुक्त राजेंद्र गलांडे यांच्या मार्गदर्शानाखाली वरिष्ठ आरोग्य निरिक्षक राम सोनवणे, गणेश खिरिड यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य निरिक्षक करण कुंभार, सचिन , वैभव घटकांबळे, प्रशांत दामले, यांच्या निरिक्षणाखाली मोकादम वैजीनाथ गायकवाड, आण्णा ढावरे, कृष्णा धनगर, अशोक खुडे विशेष सहकार्य आम्रपाली चव्हाण, भारत दिगोळ जनसेवक बाळू दांडेकर, श्री वीरप्रभू, श्री. शेळके, भारती कांबळे, यश थोरात यांचे विशेष योगदान लाभले. सदर अभियानात २०० शालेय व महाविद्यालयीन शिक्षण घेणारे तरुण सहभागी झाले.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन