‘या’ कार्यालयातून चालणार अजित पवार गटाचे कामकाज, शरद पवारांच्याच हस्ते झाले होते उद्घाटन…

0
3

अजित पवारांच्या बंडानंतर उपराजधानीत राष्ट्रवादीत फूट पडली आहे. शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे, प्रदेश अधिकारी शेखर सावरबांधे, प्रवक्ते प्रवीण कुंटे पाटील यांनी शरद पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला.शहर कार्यालयात आयोजित बैठकीत तसा ठराव घेण्यात आला. प्रशांत पवार, बाबा गुजर हे नेते अजित पवार यांच्यासोबत गेले .शहर कार्यालयावर शरद पवार गटाला ताबा मिळाला आहे. त्यामुळेच आता प्रशांत पवार यांच्या बजाजनगर कार्यालयातून अजित पवार गटाचा कारभार चालवला जाणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांनी गुरुवारी बाबा गुजर यांची नागपूर जिल्हाध्यक्षपदी तर प्रशांत पवार यांची प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती केली. तीन दिवसांपूर्वी जयंत पाटील यांनी गुजर यांची पक्षातून हकालपट्टी केली होती. बाबा गुजर, प्रशांत पवार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलचे माजी प्रदेशाध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष ईश्वर बाळबुधे, जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती सतीश शिंदे, नरेश अरसाडे, राजा आकरे, भागेश्वर फेंडर, रमेश फुले, पुंडलिक राऊत आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे.

अधिक वाचा  राज्य मंत्रीमंडळ बैठकीत 14 निर्णय; मुंबई- ठाणे नविन मेट्रो मार्गिका, पुणे-लोणावळा हा निर्णय, सर्व जाणून घ्या! 

राष्ट्रवादीचे नवनियुक्त अध्यक्ष सुनील तटकरे, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. उर्वरित नियुक्त्याही लवकरच जाहीर केल्या जातील. हे पाहता नागपूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे भगदाड पडेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

बाबा गुजर, प्रशांत पवार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलचे माजी प्रदेशाध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष ईश्वर बाळबुधे, जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती सतीश शिंदे, नरेश अरसाडे, राजा आकरे, भागेश्वर फेंडर, रमेश फुले, पुंडलिक राऊत आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादीचे नवनियुक्त अध्यक्ष सुनील तटकरे, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. उर्वरित नियुक्त्याही लवकरच जाहीर केल्या जातील. हे पाहता नागपूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे भगदाड पडेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

अधिक वाचा  संविधानाच्या माध्यमातून पंचशीलेला कायद्याचे अधिष्ठान प्राप्त झाले आहे – विनोद मोरे

अजित पवार यांच्या बंडानंतर राज्यातून निलंबित करण्यात आलेल्यांमध्ये बाबा गुजर यांचा समावेश होता. पवार हे प्रफुल्ल पटेल यांचे समर्थक आणि ईश्वर बाळबुधे हे छगन भुजबळांचे समर्थक असल्याने ते जातील अशी सर्वांनाच अपेक्षा होती. सतीश शिंदे आणि नरेश अरसाडे हे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या काटोल-नरखेड विधानसभा मतदारसंघातून आहेत.देशमुख आणि शिंदे कुटुंबात सुरुवातीपासूनच राजकीय वैर आहे. सतीश शिंदे यांनी यापूर्वीही देशमुख यांच्या विरोधात शिवसेनेकडून विधानसभा निवडणूक लढवली होती. अरसाडे हे पूर्वी देशमुख समर्थक होते. देशमुख राजकीय समस्या निर्माण करत असल्याने दोघांनी अजित पवारांसोबत घेण्याचा निर्णय घेतला.

अधिक वाचा  रुणवाल पॅनोरमा सोसायटीत श्रीचरणी कामगार कवी राजेंद्र वाघ यांच्या कविता सादर 

बजाजनगर काचीपुरा येथील प्रशांत पवार यांच्या कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विभागीय कार्यालय आहे. या कार्यालयासमोरील फलकाचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले होते. नुकतेच अजित पवार यांनी महिनाभरापूर्वी या कार्यालयात पदाधिकाऱ्यांशी चर्चाही केली होती. सुमारे तासभर ते या कार्यालयात थांबले होते. गणेशपेठ येथील कार्यालय सध्या शरद पवार गटाच्या ताब्यात आहे. त्यामुळेच अजित पवार पक्षाची सूत्रे सुरुवातीला बजाजनगरमधून हलतील असे दिसते.