११ लाख लोकसंख्येपैकी पावणे सात लाख लाभार्थी! शिंदेंचा हा अजितदादांना सल्ला

0

गडचिरोली येथे ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात पहिल्यांदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पहिल्यांदा एकत्र होते. यावेळी एकनाथ शिंदे यांनी संबोधित केले.गडचिरोलीच्या इतिहासात पहिल्यांदा एवढी मोठी गर्दी जमा झालेली आहे. ११ लाख लोकसंख्येपैकी पावणे सात लाख लोकांची लाभार्थी म्हणून नोंद झाली आहे. आतापर्यंत झालेल्या कार्यक्रमाचे रेकॉर्ड मोडलेले आहे.

अजित पवार पहिल्यांदा कार्यक्रमात आलेले आहेत. अनेक घटना पहिल्यांदा घडलेल्या आहेत. सरकारच्या वर्षपूर्तीनंतर पहिलाच कार्यक्रम गडचिरोलीमध्ये होत आहे. सर्वसामन्य लोकांना योजनांचा लाभ व्हावा, यासाठी शासन आपल्या दारी हा कार्यक्रम हाती घेतला आहे, असे शिंदे म्हणाले.
सरकारी काम सहा महिने थांब ही संकल्पना आम्ही मोडीत काढली आहे, असे शिंदे म्हणाले. यावेळी एकनाथ शिंदे यांनी अजित पवार यांना सल्ला दिला आहे. तोंडात अंजिर आणि हातात खंजीर असलेले लोक घातक असतात. पक्षात दुय्यम स्थान दिल्यानंतर अशा घटना घडतात, असा सल्ला शिंदेंनी पवारांना दिला, असे शिंदे म्हणाले.
एकनाथ शिंदे म्हणाले, मेहनती आणि कष्टकरी माणसाला जेव्हा दुय्यम स्थान दिले जाते. त्याच्यावर अन्याय होतो. त्यावेळी अजित पवार यांच्यासारख्या घटना घडतात. त्यामुळे हे ट्रीपल इंजीन सरकार राज्याला विकासाकडे घेऊन जावू, तोंडात अंजिर आणि हातात खंजीर असलेले लोक घातक असतात, असे अजित पवार यांना कळले आहे.

अधिक वाचा  निवृत्तीच्या उंबरठ्यावर नसलेल्या शिक्षकांना ‘टीईटी’ बंधनकारक; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य सरकारची काय भूमिका?