सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रात आज “एक सही संतापाची” हा उपक्रमाअंतर्गत महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोथरूड विभागाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, कोथरूड गावठाण येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये कोथरूडकर नागरिक मोठ्या संख्येने उत्स्फूर्तपणे कल्पकही सहभाग नोंदवला आहे.
महाविद्यालयीन तरुण, तरुणी, सामान्य नागरिक, गृहिणी, जेष्ठ नागरिक, रिक्षावाले, व्यावसायिक आदी लोकं ह्या सुरू असलेल्या घाणेरड्या राजकारणाच्या विरोधात संताप व्यक्त करण्यासाठी स्वतः पुढे येत व्यक्त झाली. आणि त्यांचा सन्माननीय राजसाहेबांच्या प्रति विश्वास अजूनही वाढलेलाच दिसत आहे. भविष्यात राजसाहेब ठाकरे यांनीच महाराष्ट्र राज्याचे नेतृत्व करावे अशी उत्स्फूर्त प्रतिक्रियाही नागरिकांकडून दिली आहे.
आजच्या कार्यक्रमाचे नियोजन मनसे कोथरूड विभाग अध्यक्ष सुधीर धावडे, सरचिटणीस किशोरभाऊ शिंदे, शहरसचिव रामभाऊ बोरकर, शैलेश जोशी, राजेंद्र वेडेपाटील, विराज डाकवे, किरण उभे, संतोष वाघमारे, हर्षद खाडे, चेतन पवार, स्वप्नील कंधारे यांच्यासह कोथरूड विभागातील पदाधिकाऱ्यांनी केले आहे.