शिरूर लोकसभा राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला… शरद पवार यांचे हे आदेश दिल्याची माहिती

0

पुणे : आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसले असताना आज पुण्यात  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पदाधिकारी बैठक संपन्न झाली असून या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा शिरूर लोकसभेचा उमेदवार ठरला असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.

भोसरीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार विलास लांडे आणि अमोल कोल्हे या दोघांमध्ये मोठी चुरस शिरूर लोकसभेसाठी पाहायला मिळत होती अखेर आज झालेल्या पदाधिकारी बैठकीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अमोल कोल्हे यांना शिरूर लोकसभेसाठी तयारी करण्याचे आदेश दिल्याची माहिती मिळाली असून यामुळे आता अमोल कोल्हे हेच शिरूर लोकसभेचे राष्ट्रवादीचे उमेदवार असणार असं बोललं जात आहे.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा