ई रिक्षाला महापालिकेच्या अनुदानाबाबत आयुक्त डॉ कुणाल खेमनार व रिक्षा संघटनांची मीटिंग संपन्न…

0

आज पुणे महानगरपालिका मेन बिल्डिंग या ठिकाणी पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ कुणाल खेमनार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली ई रिक्षाला महानगरपालिकेच्या मार्फत मिळणाऱ्या अनुदानाबाबत पुण्यातील रिक्षा संघटनांची मीटिंग संपन्न झाली, या मीटिंगसाठी पुणे महानगरपालिकेच्या वतीने सहाय्यक आयुक्त माननीय श्री माधव जगताप ,पर्यावरण विभागाचे श्री महेश डोईफोडे त्याचप्रमाणे दिघे साहेब हे उपस्थित होते त्याचप्रमाणे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी माननीय श्री डोंगरजाळ साहेब तसेच वरिष्ठ लिपिक माननीय श्री घोडे साहेब हेही उपस्थित होते, रिक्षा संघटनांच्या वतीने प्रतिनिधी म्हणून पुणे शहर ऑटो रिक्षा फेडरेशनचे अध्यक्ष आनंद उर्फ बंडू शेठ तांबे पुणे शहर ऑटो रिक्षा फेडरेशनचे सल्लागार माननीय श्री बाबा पायगुडे ,महाराष्ट्र रिक्षा पंचायत चे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री बाबासाहेब कांबळे यांच्या वतीने पुणे शहर अध्यक्ष महंमद शेख व पुणे शहर कार्याध्यक्ष श्री विलास केमसे, रिक्षा पंचायत चे निमंत्रक नितीन पवार, आम आदमी रिक्षा संघटनेचे *आनंद अंकुश इत्यादी प्रतिनिधी उपस्थित होते, याप्रसंगी ई रिक्षासाठी महानगरपालिकेच्या वतीने पंचवीस हजार रुपये अनुदान देण्याचे किंवा त्यापेक्षाही अधिक देण्याचा प्रयत्न करण्याचे आश्वासन अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार साहेबांनी व्यक्त केले पुणे शहर ऑटो रिक्षा फेडरेशनच्या वतीने अध्यक्ष आनंद तांबे यांनी या मीटिंगमध्ये खालील प्रमाणे प्रामुख्याने मागण्या केल्या.
_ई रिक्षा ची किंमत व बॅटरीची किंमत ही रास्त व रिक्षा चालकांना परवडणारी असावी
_ई रिक्षाचे सस्पेन्शन चांगले असावे _जुन्या रिक्षांना ई रिक्षाचे कन्व्हर्शन किट बसवण्यास परवानगी देण्यात यावी तसेच त्यांना सुद्धा 25 हजार रुपयांचे अनुदान देण्यात यावे
_ पुणे शहरात नवीन रिक्षा स्टॅन्डसाठी मंजुरी देण्यात यावी
_पुणे शहरात योग्य त्या ठिकाणी रिक्षा स्टॅन्ड ला बस स्टॉप सारखे शेड करून मिळावेत
_रिक्षासाठी ई चार्जिंग सेंटर पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून द्यावेत इत्यादी मागण्या करण्यात आल्या या सर्व मागण्यांचा प्राधान्याने विचार केला जाईल असे अतिरिक्त आयुक्त माननीय डॉक्टर कुणाल खेमनर साहेब यांनी आश्वासन दिले

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती