‘आजकाल मुस्लिमांचा द्वेष करणं ही फॅशन…’: नसीरुद्दीन शाहांचा पंतप्रधान मोदींवर निशाणा

0
2

अभिनेता नसीरुद्दीन शहा हे अफलातून कलाकार आहे. ते आपली भूमिका प्रामाणिकपणे निभवत असतात. त्यांच नाव हे त्या बॉलिवूड स्टार्समध्ये समाविष्ट आहे, जे त्यांच्या उत्कृष्ट अभिनयाबरोबरच वक्तव्यांसाठीही ओळखले जातो.

नुकतेच ते ‘ताज’ या वेबसिरिजमध्ये दिसले. यामधील त्याचा अभिनय प्रेक्षकांना खुप आवडला. वक्तव्यामुळे चर्चेत असणारे नसीरुद्दीन देशाच्या प्रत्येक मुद्द्यावर सडेतोड उभ भाष्य करत असतात. नसीरुद्दीन शाह यांनी नुकतेच सरकारवर टीकास्त्र सोडले. मुस्लिमांविरुद्ध द्वेष ही फॅशन झाली आहे.. जे सरकार सिनेमाच्या माध्यमातून अतिशय चलाखीने पसरवत असल्याचा आरोप त्यांनी सरकारवर केला.

अलीकडेच नसीरुद्दीन शाह यांनी मिडियाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, ‘काही चित्रपट आणि शोचा वापर हा प्रचार म्हणून केला जात आहे. त्याचबरोबर त्यांचा वापर निवडणुकीत मतं मिळविण्यासाठीही केला जात आहे. हा सत्ताधारी पक्ष अतिशय चतुराईने त्यांचा वापर करत आहे, त्यामुळेच सुशिक्षितांनाही मुस्लिमांचा द्वेष करण्याची फॅशन झाली आहे.

अधिक वाचा  संविधानाच्या माध्यमातून पंचशीलेला कायद्याचे अधिष्ठान प्राप्त झाले आहे – विनोद मोरे

इतकच नाही तर निवडणूक आयोगही अशा गोष्टींवर गप असतो. राजकीय पक्ष निवडणुकीसाठी धर्माचा वापर करतात तेव्हा निवडणूक आयोग मौन असते. दुसरीकडे, अल्ला हू अकबर म्हणत कोणत्याही मुस्लिम नेत्याने मते मागितली असती तर आतापर्यंत खुप मोठा गोंधळ झाला असता असंही ते म्हणाले.

नसीरुद्दीन शाह यांचा पंतप्रधान मोदींवर निशाणा :

नसीरुद्दीन शाह इथेच थांबले नाहीत, तर त्यांनी यानंतर पीएम मोदींवरही निशाणा साधला, ते म्हणाले, पण इथे आमचे पंतप्रधान असेच बोलतात आणि तरीही हरतात. तर, मला आशा आहे की हे लवकरच संपेल. पण या क्षणी ते नक्कीच शिखरावर आहे. हे या सरकारने खेळलेले अतिशय मास्टर कार्ड आहे आणि ते काम करतय. बघू किती दिवस ते काम करण चालू ठेवते.

अधिक वाचा  राज्यात ओबीसी उपसमिती काय काम करणार?; उपसमितीची कार्यकक्षाही निश्चित झाली फडणवीसही सरसावले

वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर नसीरुद्दीन शाह शेवटचे वेब सीरिज ‘ताज’मध्ये दिसले होते. यात त्याच्यासोबत आदिती राव हैदरी, आशिम गुलाटी, संध्या मृदुल, राहुल बोस असे दिग्गज कलाकारही दिसले होते.