राज्य सरकारकडून सचिन तेंडूलकर यांना मोठी जबाबदारी; थेट ‘ब्रँड ॲम्बेसेडर’ पदी नियुक्ती

0
1

मास्टर ब्लास्टर क्रिकेटपटू आणि भारतरत्न सचिन तेंडुलकर यांची आज (३० मे) राज्य सरकारच्या ‘स्वच्छ मुख अभियाना’चे ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून निवड करण्यात आली. राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी याबाबतची माहिती दिली आहे. मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतरांच्या उपस्थितीत या अभियानाची सुरुवात करण्यात आली.

वैद्यकिय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागात ‘स्वच्छ मुख अभियाना’साठी आज (३० मे) सामंजस्य करार स्वाक्षरी कार्यक्रम पार पडला. राज्य सरकारकडून राबवल्या जाणाऱ्या या अभियानासाठी ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून लोकांमध्ये जनजागृतीची करण्याची महत्त्वाची जबाबदारी पार पाडण्यासाठी सचिन तेंडुलकर याची निवड करण्यात आली आहे.

अधिक वाचा  पुणे मानाचे गणपती विसर्जन मिरवणुक वेळापत्रक समोर, असा असेल मार्ग? पोलिस आयुक्त अमितेश कुमारांची माहिती

महाराष्ट्र सरकारकडून त्यांची ‘स्माइल अ‍ॅम्बेसेडर’ म्हणून नियुक्ती करण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला. भारतीय दंत संघटनेने (IDA) तोंडाचे आरोग्य आणि स्वच्छता सुधारण्यासाठी आणि चांगल्या मौखिक स्वच्छतेचे महत्त्व भारतीयांना शिक्षित करण्यासाठी एक राष्ट्रीय अभियान सुरू केले. पुढील पाच वर्षे सचिन तेंडुलकर हे या अभियानाचे ‘स्माइल ॲम्बेसेडर’ म्हणून काम करणार आहेत.

निळू फुले यांची मुलगी, अभिनेत्री गार्गी फुले आज राष्ट्रवादीत करणार प्रवेश
सचिन तेंडुलकर यांनी या अभियानाच्या सदिच्छादूत पदाची जबाबदारी स्वीकारल्याने या अभियानाला मोठ्या प्रमाणाच प्रतिसाद मिळेल, असा विश्वासही यावेळी मंत्री महाजन आणि देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

अधिक वाचा  कोथरूड सर्वपक्षीय गणेश विसर्जन नियोजन समिती; 17वा विसर्जन नियोजन महोत्सव…तोच उत्साह …तोच ध्यास!

देशात गेल्या काही वर्षात मौखिक कर्करोगात मोठी वाढ झाली आहे. अशा मौखिक आजारावर नियंत्रण आणण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने नमूद केलेल्या मौखिक आरोग्याबाबत कृती योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकारने या वर्षीपासून ‘स्वच्छ मुख अभियान‘ राबविण्याचा निर्णय घेतला आहे.