चहल-धनश्री वर्मा घटस्फोट खटल्यात हाय कोर्टाचा महत्त्वाचा आदेश

0
1

सध्या टीम इंडियाचा क्रिकेटर युजवेंद्र चहल आणि कोरियोग्राफर धनश्री वर्मा यांच्या घटस्फोटाची चर्चा आहे. कौटुंबिक न्यायालयात हा खटला दाखल करण्यात आलाय. घटस्फोटाचा खटला कौटुंबिक न्यायालयात दाखल केल्यानंतर दोघांना पूनर्विचारासाठी सहा महिन्यांचा किमान कालावधी दिला जातो. हा किमान कालावधी रद्द करावा अशी विनंती युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा दोघांनी केली होती. पण कौटुंबिक न्यायालयाने त्यांची विनंती फेटाळून लावली होती. आता मुंबई उच्च न्यायालयाने सहा महिन्यांचा किमान कालावधी रद्द करण्याच्या मागणीची दखल घेतली आहे.

आगामी आयपीएलमधील चहलची कमिटमेंट लक्षात घेऊन उद्या घटस्फोटाच्या याचिकेबद्दल निर्णय घ्या, असे निर्देश न्यायाधीश माधव जामदार यांनी वांद्रे कौटुंबिक न्यायालयाला दिले आहेत. आगामी आयपीएलपूर्वी तातडीनं घटस्फोट मिळवण्यासाठी दांपत्यानं कुटुंब न्यायालयाच्या निकालाला हायकोर्टात आव्हान दिलं होतं. चहल आणि धनश्री वर्मा यांनी परस्पर सहमतीनं घटस्फोटासाठी याचिका दाखल केलीय.

अधिक वाचा  राज्यात 8 जिल्ह्यांना पुन्हा ‘ऑरेंज’अलर्ट गणेश विसर्जन पावसात?; कोकण, मध्य महाराष्ट्र अतिवृष्टीचा इशारा

कधीपासून वेगळे राहत होते?

डिसेंबर 2020 मध्ये चहल आणि धनश्री वर्मा यांनी लग्न केलं होतं. जून 2022 पासून दोघे वेगळे राहतायत. हिंदू विवाह कायद्याच्या कलम 13 बी नुसार, पाच फेब्रुवारी 2025 रोजी त्यांनी घटस्फोटासाठी अर्ज केला. घटस्फोटासाठी अर्ज करताना त्यांनी पूनर्विचारासाठी बंधनकारक असलेला सहा महिन्यांचा किमान कालावधी रद्द करण्याची विनंती केली होती. 20 फेब्रुवारीला कौटुंबिक न्यायालयाने दोघांची मागणी अमान्य केली.

कौटुंबिक न्यायालायने मागणी का फेटाळलेली?

करारानुसार युजवेंद्र चहल धनश्री वर्माला कायमस्वरुपी पोटगी म्हणून 4.75 कोटीची रक्कम द्यायला तयार झालेला. यातले 2.37 कोटी रुपये आधीच दिले होते. उर्वरित रक्कम दिलेली नाही. यामुळे कराराच अनुपालन होत नाहीय. म्हणून किमान कालावधी रद्द करण्याची त्यांची मागणी फेटाळून लावली. पण आता उच्च न्यायालयाने वांद्रे कौटुंबिक न्यायालयाचा निर्णय बदललाय.

अधिक वाचा  कोथरूड सर्वपक्षीय गणेश विसर्जन नियोजन समिती; 17वा विसर्जन नियोजन महोत्सव…तोच उत्साह …तोच ध्यास!