वाढत्या उष्णतेमुळे अर्धा तास लवकर नमाज पठण, नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन

0
Varanasi: People offer Eid-ul-Fitr namaz in Varanasi on June 5, 2019. (Photo: IANS)

सोलापूर : राज्यातील तापमानात वाढ होत असल्याचं चित्र दिसत आहे. काही ठिकाणी तापमानाचा पारा 40 अंशाच्या आसपास गेला आहे. या उष्णतेचा मोठा त्रास राज्यातील नागरिकांना सहन करावा लागत आहे. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरात अर्धा तास आधी नमाज पठण केलं जाणार आहे. सोलापूरचे शहर काझी मुफ्ती सय्यद अमजद अली यांनी माहिती दिली आहे.

सोलापूर शहरात अर्धा तास आधी नमाज पठण केलं जाणार असल्याची माहिती सोलापुरच्या शहर काझींनी दिली आहे. सोलापुरातल्या शाही आलमगीर ईदगाह, पानगल हायस्कुल आणि आलमगीर ईदगाह, होटगी रोड या ठिकाणी सकाळी 8.30 वाजता नमाज पठण होणार आहे. दरवर्षी सकाळी 9 वाजता नमाजला सुरुवात होते. पण सोलापुरात मागील आठवड्याभरापासून तापमान 41 अंशापेक्षा जास्त आहे. या पार्श्वभूमीवर नमाज अर्धा तास लवकर तसेच नमाज नंतर दिला जाणारा खुतबा कमीत कमी वेळा पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन
राज्यातील तापमानात वाढ होत असल्याचं चित्र दिसत आहे. काही ठिकाणी तापमानाचा पारा 40 अंशाच्या आसपास गेला आहे. या उष्णतेचा मोठा त्रास राज्यातील नागरिकांना सहन करावा लागत आहे. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. घरातून बाहेर पडताना गोड खाण्याचे सोबत पाणी बॉटल ठेवण्याचे तसेच उन्हापासून स्वतःची काळजी घेण्याचे शहर काझी यांनी आवाहन केले आहे. राज्यातील इतर ईदगाह कमिटीनी देखील नमाजला येणाऱ्या बांधवाना त्रास होणार नाही याची काळजी घेण्याचे सोलापूरच्या शहर काझींनी आवाहन केले आहे.

अधिक वाचा  कोथरूडला ऐन दिवाळीत ‘तात्काळ’ कारवाई धडाका?; भाजपाची एक तक्रार अन् पालिका प्रशासन तडफदार

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अॅक्शन मोडमध्ये
खारघरमधील घटनेनंतर उष्माघात किती भयावह असू शकतो हे दिसून आले. उन्हाळ्यात उष्माघातामुळे देशभरात होणारे हजारो मृत्यू टाळण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने संपूर्ण देशासाठी एकसारखा हिट ऍक्शन प्लान तयार करण्याचा विडा उचलला आहे. त्यासाठी नागपुरातील विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेला जबाबदारी सोपवली असून त्याचा अहवाल लवकरच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला सोपवला जाणार आहे. याच अभ्यासात काही महत्त्वाचे प्रश्न समोर आले आहेत, ज्याचा विचार शहरांमध्ये राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाने करण्याची गरज आहे.