‘तर मग टेकडी कशी असते?’ खा. सुप्रिया सुळेंचा मनपा आयुक्त विक्रम कुमार यांना सवाल…

0

पुणे :  वेताळ टेकडीच्या प्रकल्पाला  नागरिकांनी विरोध दर्शवला आहे. त्याविषयी जाणून घेण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी मंगळवारी वेताळ टेकडीची पाहणी केली. जनतेचा विरोध होत असेल, तर प्रशासनाने त्याचा विचार केला पाहिजे. पुण्याचे पर्यावरण  वाचविणे आवश्यकच आहे. टेकडीवरील पर्यावरण कमी न करता, एकही झाड न कापता त्या रस्त्यासाठी इतर पर्याय पाहायला पाहिजे, असे खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या. सध्या वेताळ टेकडीवरील प्रस्तावित बालभारती रस्त्याला विरोध होत आहे. त्याबाबत जाणून घेण्यासाठी सुप्रिया सुळे  मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास वेताळ टेकडी येथे आल्या होत्या. त्यांनी कृती समितीच्या सदस्यासोबत रस्ता कुठून जाणार आहे? किती आणि कोणती झाडं तोडली जाणार, याबाबत माहिती घतेली. त्यानंतर वन विभागाच्या कार्य़ालयात जाऊन कृती समितीने तयार केलेले टेकडीबाबतचे सादरीकरण जाणून घेतले.

अधिक वाचा  राष्ट्रवादीकडून महापालिका निवडणुकांसाठी या नेत्यांची विभागनिहाय ‘निवडणूक प्रभारी’ म्हणून नियुक्ती जबाबदारी दिलेल्या नेत्यांची नावे जाहीर; सविस्तर वाचा!

तर मग टेकडी कशी असते?

पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यापूर्वी म्हणाले होते की, रस्ता होतोय, ती टेकडीच नाही.
यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, काही लोक म्हणतात, टेकडीवर रस्ता आहे, तर काही लोक म्हणतात टेकडीवर रस्ता नाही.
यामध्ये वस्तूस्थिती काय आहे? ते पाहण्यासाठी मी टेकडी पाहण्यासाठी आले. प्रशासनाला वाटत असेल की, ही टेकडी नाही, तर मग मी पाहिली ना ही टेकडीच आहे. त्यांना जर वाटत नसेल की ही टेकडी नाही, तर मग टेकडी कशी असते? असा अप्रत्यक्ष सवाल त्यांनी पालिका आयुक्तांना विचारला.

अधिक वाचा  पुणे भाजपच्या दुटप्पी भूमिकेने शिवसेनेपुढे प्रश्नचिन्ह?; पदरात तोकड्याच जागा अन् त्याही एकदम कडक पाषाण