राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार अहिल्यानगर जिल्ह्यातील निवडणुकीच्या प्रतीक्षेत असलेल्या 12 नगरपंचायत अन् नगरपरिषदांसाठी लोकसंख्येनुसार सदस्य संख्या आरक्षणासह निश्चित करण्यात आली आहे. विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी ही सदस्य संख्या राजपत्रासह प्रसिद्ध केली आहे. आरक्षणासह निश्चित करण्यात आलेल्या सदस्यसंख्येत अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वाधिक श्रीरामपूर नगरपरिषदेत 34 सदस्य असणार आहेत. तर नेवासा नगरपंचायतीमध्ये सर्वात कमी 17 सदस्य संख्या निश्चित करण्यात आली आहे.
श्रीरामपूर, कोपरगाव, संगमनेर, जामखेड, राहाता, राहुरी, श्रीगोंदा, पाथर्डी, शेवगाव, देवळाली प्रवरा आणि शिर्डी या नगरपरिषद अन् नेवासे नगरपंचायत, अशा एकूण 12 पालिकांमधून निवडणुका प्रस्तावित आहेत.
या नगरपरिषद अन् नगरपंचायतीच्या प्रभाग रचनचा कार्यक्रम सुरू आहे. प्रभाग रचना 22 ते 28 ऑगस्ट दरम्यान हरकतीसह प्रसिद्ध होईल. यानंतर 3 ते 6 ऑक्टोबरला अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध केली जाणार आहे.
श्रीरामपूर- एकूण संख्या 34, महिला राखीव 17, अनुसूचित जाती 6, जमाती 1, नामाप्र 9 आणि सर्वसाधारण 8.
कोपरगाव- एकूण संख्या 30, महिला राखीव 15, अनुसूचित जाती 5, जमाती 3, नामाप्र 8, आणि सर्वसाधारण 8.
संगमनेर – एकूण संख्या ३०, महिला राखीव 15, अनुसूचित जाती 2, जमाती शून्य, नामाप्र 8, सर्वसाधारण 8.
जामखेड- एकूण संख्या 24, महिला राखीव 12, अनुसूचित जाती 3, जमाती 1, नामाप्र 6 आणि सर्वसाधारण 7.
राहाता- एकूण संख्या 20, महिला राखीव 10, अनुसूचित जाती 3, जमाती 1, नामाप्र 5 व सर्वसाधारण 4.
शेवगाव- एकूण संख्या 24, महिला राखीव 12, अनुसूचित जाती 4, जमाती शून्य, नामाप्र 6 व सर्वसाधारण 7.
राहुरी- एकूण संख्या 24, महिला राखीव 12, अनुसूचित जाती 4, जमाती 2, नामाप्र 6 आणि सर्वसाधारण 6.
श्रीगोंदा- एकूण संख्या 22, महिला राखीव 11, अनुसूचित जाती 3, जमाती नामाप्र 6 आणि सर्वसाधारण 6.
पाथर्डी- एकूण संख्या 20, महिला राखीव 10, अनुसूचित जाती 2, जमाती शून्य, नामाप्न 5 आणि सर्वसाधारण 6.
देवळाली प्रवरा- एकूण संख्या 21, महिला राखीव 11, अनुसूचित जाती 3, जमाती 1. नामाप्र 6 आणि सर्वसाधारण 4.
शिर्डी- एकूण संख्या 23, महिला राखीव 12, अनुसूचित जाती 5, जमाती 1, नामाप्र 6 आणि सर्वसाधारण 6.
नेवासे (नगरपंचायत)- एकूण संख्या 17, महिला राखीव 9, अनुसूचित जाती 2, जमाती 1, नामाप्र 5 व सर्वसाधारण 5.