“या भीतीपोटीच मोदी सरकारने काश्मीर केंद्रशासित केलं”, माजी राज्यपाल मलिक यांचा मोठा दावा!

0
3

जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते सत्यपाल मलिक यांनी एका संकेतस्थळासाठी दिलेल्या मुलाखतीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा सरकारवर काही गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या या आरोपांवरून सध्या देशभर राजकीय चर्चा सुरू झाली आहे. करण थापर यांनी ‘द वायर’साठी घेतलेल्या मुलाखतीमध्ये सत्यपाल मलिक यांनी विविध मुद्द्यांवर स्पष्ट आणि रोखठोक उत्तरं दिली. “पुलवामा हल्ला आमच्या चुकीमुळे झाल्याचं मोदींना सांगितलं तेव्हा त्यांनी गप्प राहायला सांगितलं”, असा दावा मलिक यांनी केला आहे. त्याचबरोबर आता काश्मीरमध्ये कलम ३७० हटवल्याच्या प्रक्रियेबाबतही त्यांनी खळबळजनक दावे केले आहेत.

अधिक वाचा  रुणवाल पॅनोरमा सोसायटीत श्रीचरणी कामगार कवी राजेंद्र वाघ यांच्या कविता सादर 

“कलम ३७० बाबत माझ्याशी कोणतीही चर्चा नाही”
सत्यपाल मलिक हे जम्मू-काश्मीरचे राज्यपाल होते. ५ ऑगस्ट २०१९ रोजी कलम ३७० हटवण्यात आलं. त्यावेळी आपल्याशी केंद्र सरकारने, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी किंवा तत्कालीन गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी कोणतीही चर्चा केली नव्हती, असं सत्यपाल मलिक म्हणाले आहेत. “हे मी शपथेवर सांगू शकतो. मला काहीच माहिती नव्हतं. ४ तारखेला रात्री मला गृहमंत्र्यांचा फोन आला की सत्यपाल मी एक चिठ्ठी पाठवतोय. सकाळी ११ वाजेच्या आधी तुमच्या कमिटीकडून मंजूर करून पाठवून द्या. माझ्या चिठ्ठीशिवाय कलम ३७० हटलंच नसतं”, असं सत्यपाल मलिक म्हणाले आहेत.
पोलीस बंडाची केंद्र सरकारला भीती!

अधिक वाचा  बुद्धीदेवता गणरायाला शालेय साहित्य आरस; मोरया मित्र मंडळाचा उपक्रम आदर्शवत : पोलीस निरीक्षक काइंगडे

दरम्यान, काश्मीरमधील पोलीसही कलम ३७० हटवल्यानंतर बंड करतील, अशी भीती केंद्र सरकारला होती, असा दावा सत्यपाल मलिक यांनी केला आहे. “काश्मीरमधील जनतेला ३७० कलम हटवण्यापेक्षा राज्य केंद्रशासित प्रदेश केलं याचं जास्त वाईट वाटलं. यातही माझा सल्ला घेतला गेला नाही. सल्ला घेतला असता तर मी सांगितलं असतं की हे नका करू. राज्य केंद्रशासित प्रदेश केलं तर तिथले पोलीस थेट केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली येतात. नाहीतर पोलीस राज्य सरकार किंवा राज्यपालांच्या नियंत्रणाखाली असतात, म्हणून हा निर्णय घेतला गेला असं मला वाटतं. तेव्हा अशी भीती होती की तिथले पोलीस बंड करू शकतात”, असं सत्यपाल मलिक म्हणाले.

अधिक वाचा  भाजपकडून राजकीय सोयीसाठी प्रभागरचनेत नियमांचे उल्लंघन; काँग्रेस-राष्ट्रवादीचा संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप

“पोलिसांच्या बंडाच्या भीतीपोटी त्यांनी केंद्रशासित प्रदेश घोषित केलं. हे मला मुख्य सचिवांनीही सांगितलं होतं. ते म्हणाले की १ हजार लोक मारावे लागतील. हे पोलीस ठाण्यात घुसतील, हत्यारं हिसकावून घेतील, पोलीस बंड करतील. मी त्यांना म्हटलं तुम्ही निश्चिंत राहा. मला विश्वास आहे की एक साधं कुत्रंही भुंकणार नाही. पण पोलीस बंड करू शकतात ही भीती निराधार होती”, असंही दावा त्यांनी केला.