कमी दाब पट्टा तीव्रतेत वाढ; 21 जिल्ह्यात यलो अलर्ट वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा

0
2

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यातील विविध भागात वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. वादळी पावसासह गारपिटही होण्याची शक्यता आहे. राज्यातील मध्य महाराष्ट्रात नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर. तर मराठवाडामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव या भागात वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भात बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या परिसरात यलो अलर्ट देण्यात आला आहे.

मागच्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने बहुंतांश जिल्ह्यातील शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्याच्या विविध भागात वादळी पाऊस गारपिटीने हजेरी लावली आहे. कमाल तापमानात काहीशी घट होऊन उकाड्यात वाढ झाली आहे. आज (ता.09) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. कमाल तापमानात घट होणार असली तरी उन्हाचा चटका आणि उकाडा कायम राहण्याची शक्यता आहे.

अधिक वाचा  ‘समस्त कोथरूड’ने देखाव्यांची ‘संस्कृती’च बदलली; सर्वत्र जिवंत देखावे अन् पौराणिक मंदिरे

ढगाळ हवामान, पावसाची हजेरी यामुळे राज्यातील कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार होत आहेत. राज्यात मागच्या 24 तासांत ब्रह्मपुरी येथे राज्यातील उच्चांकी 39.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. दक्षिण राजस्थान आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून 5.8 किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वाऱ्यांची स्थिती, मध्य महाराष्ट्र ते केरळपर्यंत समुद्र सपाटीपासून 1.5 किलोमीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्याने राज्यात पावसाला पोषक हवामान आहे.