देशात महागाई अणि बेरोजगारी वाढली मोदीचे अर्थकारणच चुकीचे : पृथ्वीराज चव्हाण

0
3

देशात महागाई अणि बेरोजगारी वाढली असून खतांच्या, वीजेच्या किंमती वाढताहेत. उत्पादन खर्चावर शेतमालाला योग्य भाव नाही. कांदा, सोयाबीन, द्राक्षे आणि कापसाला दर नाही, म्हणून शेतकरी उध्वस्त झाला आहे. मोदीचे अर्थकारणच चुकीचे आहे, असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. पोतले ( ता. कराड ) येथील विविध विकासकामांच्या उदघाटन व भूमिपूजनप्रसंगी पृथ्वीराज चव्हाण बोलत होते. पोतले-येणके दरम्यान वांग नदीवरील आठ कोटी चार लाख रूपये खर्चातून बांधलेल्या पुलाचे उदघाटन त्यांच्या हस्ते झाले. यासह ९२ लाख रूपये खर्चातून जलजीवन मिशन अंतर्गत नळपाणी योजना, पोतले-पंतोजीमळा दरम्यान २ कोटी ४० लाख खर्चातून पूल बांधकाम, रस्ता काँक्रीटीकरण ३ लाख ५० हजार आदी कामांचे भूमिपूजन यावेळी झाले.

अधिक वाचा  राज्य मंत्रीमंडळ बैठकीत 14 निर्णय; मुंबई- ठाणे नविन मेट्रो मार्गिका, पुणे-लोणावळा हा निर्णय, सर्व जाणून घ्या! 

श्री. चव्हाण म्हणाले, देशात सरकारी कंपन्याची विक्री सुरू आहे. आदाणी प्रकरण उघडकीस आले असून अदाणी कंपनीचा १४० अब्ज डॅालर्सचा तोटा पंधरा दिवसात झाल्याचे उघड झाले आहे. बोगस चोरी पकडली आहे. त्यामुळे मोदीचे अर्थकारण चुकीचे आहे. त्या विरोधात आम्ही लवकरच आरोपपत्र सादर करणार आहे. उलट कांग्रेसच्या काळात लोकशाही पध्दतीने देशाची प्रगती झाल्याचे ते म्हणाले. विविध पदाधिकाऱ्याचे व गुणवंत विद्यार्थ्यात पायल काळे व ऋतुराज जगताप याचे सत्कार यावेळी झाले.