टीका करायला मर्दच भेटत नाही, यांना बुरखे घालून पळायला लावतो; धंगेकरांची भाजप नेत्यावर गंभीर टीका

0

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते व माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी पुण्यातील जैन बोर्डिंग प्रकरणात चतुशृंगी पोलीस ठाण्यात जात या प्रकरणाची नीट चौकशी करण्याची मागणी करणार केली आहे. धर्मदाय आयुक्त आणि बिल्डर-राजकारणी यांच्यातील लागेबांधे याची चौकशी झाली पाहिजे, अशी भूमिका धंगेकर यांनी घेतली आहे.

याबाबत माध्यमांशी बोलताना धंगेकर म्हणाले, ‘धर्मदाय आयुक्तालयात अनेक वर्षे प्रकरणे पेंडिंग राहतात, पण जैन बोर्डीग जमीन प्रकरणात लगेच कारवाई का करण्यात आली ? असा सवाल धंगेकर यांनी उपस्थित केला आहे. धर्मदाय आयुक्त एवढे फास्ट कधीच निर्णय देत नाहीत, मग या प्रकरणात कसा घेतला असे देखील प्रश्न विचारला आहे.

अधिक वाचा  हातावर ‘रि’ अन् चारपानी तक्रारीत ९ वेळा ‘री’ या एका वेलांटीवरुन डॉक्टर युवतीची हत्या की आत्महत्या? मृत्यू प्रकरण उलगडण्याची शक्यता

पोलीस स्टेशनमध्ये जी तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत कोणाचेही नाव लिहिणार नाही, पण या प्रकरणांमध्ये कोण कोण आहेत ही माहिती हवी असेल तर पोलिसांनी गोखले बिल्डरला विचारणा करणे आवश्यक असल्याचा, असा टोला त्यांनी लगावला आहे.

भाजप (BJP) नेत्यांवर करण्यात येणाऱ्या टिकेबाबत विचारले असता धंगेकर म्हणाले, एकनाथ शिंदे साहेबांनी थोडं थांबायला सांगितलं आहे. मात्र पोल खोल तर व्हायलाच पाहिजे याबाबत मोठ्या प्रमाणात माझ्याकडे पुरावे आहेत, मात्र, यावर नंतर बोलेन. गुन्हेगारीवर बोललच पाहिजे. कारण शहरात 70 टोळ्या कार्यरत आहेत. त्यांचा सामान्य नागरिकांना त्रास होत असून पुणेकरांच्या प्रश्नांनवर बोलत राहणार. त्यावर नाही बोललो तर ती पिढी मला माफ करणार नाही, असेही धंगेकर म्हणाले.

अधिक वाचा  बौद्धजन पंचायत समिती शाखा क्र. ७४१ च्या वतीने ६९ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा

माझ्याकडे राजकीय विषय भरपूर आहेत. राजकीय पटलावरती कोणी आले तरी आपण कमी पडणार नाही. मात्र त्यासाठी कुणीतरी मर्द भेटला पाहिजे. मला आरोप करण्यासाठी अद्यापपर्यंत कोणी मर्द भेटलेला नाही. त्यांच्या औकातीवर मला जायचंय, पण थोडे दिवस जाऊ द्या सगळ्यांची औकात काढतो, असा इशाराही त्यांनी दिला.

मी कोणाच्या कुटुंबावर जात नाही, मला चांगली शिकवण आहे, तुम्ही माझ्या कुटुंबावर आरोप का ? करत आहेत. त्यामुळे मी जेव्हा टीका करेल तेव्हा सगळ्यांना पुण्यामध्ये बुरखा घालून पळावे लागेल, असे म्हणत धंगेकर यांनी सत्ताधाऱींवर अप्रत्यक्षपणे हल्ला चढवला.

अधिक वाचा  जैन बांधवांनी कधीही माझं नाव घेतलं नाही; काही स्वार्थ साधून घेत होते, जैन बोर्डिंगची डील रद्द होताच मोहोळ स्पष्टच बोलले