पुणे ZP निवडणुक 73 गट आरक्षण, देवाभाऊची हरकत अन् जिल्हाधिकार्‍यांनी आरक्षित गट बदलला; पहा यादी

0

पुणे जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 73 गटांच्या आरक्षणाची सोडत सोमवारी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली जाहीर करण्यात आली आहे. नवीन आरक्षण पद्धतीनुसार अनुसूचित जाती आणि जमाती यांचे आरक्षण हे जिल्ह्यातील गटांमध्ये सर्वाधिक लोकसंख्येच्या गटापासून उतरत्या क्रमानं काढणं अपेक्षित आहे. मात्र, अनुसूचित जाती गटाचे आरक्षण काढताना हवेली तालुक्यातील लोणी काळभोर गटाऐवजी इंदापूर तालुक्यातील भिगवण गट आरक्षित असल्याचं सांगण्यात आलं. तेव्हा उरुळीकांचन येथील रहिवाशी देवा (देवाभाऊ) गायकवाड यांनी भिगवण गटातील अनुसूचित जातीची लोकसंख्या लोणी काळभोरपेक्षा कमी असल्याचं जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या निदर्शनास आणून दिलं. तेव्हा डुडी यांनी देखील निवडणूक शाखेची चूक झाल्याचं मान्य केलं आणि अनुसूचित जातीसाठी भिगवण ऐवजी लोणी काळभोर गटाची सोडत काढली.

पुणे जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी ७३ गटांसाठीची आरक्षणाची सोडत सोमवारी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सोडतीनुसार अनुसूचित जातीसाठी ७, अनुसूचित जमातीसाठी ५, तर नागरिकांचा मागासवर्गीय प्रवर्गासाठी १९ गट राखीव झाले आहेत. त्यापैकी १० जागा महिलांसाठी राखीव आहेत. तर सर्वसाधारण प्रवर्गासाठी ४२ गट राखीव असून, त्यापैकी २० गट महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. एकूण ७३ गटांपैकी ३७ गट महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. त्यामध्ये अनुसूचित जाती सात गट असून त्यापैकी चार गट महिलांसाठी, अनुसूचित जमातीसाठी पाच गट असून त्यापैकी ३ गट महिलांसाठी तर नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी १९ गट राखीव असून त्यापैकी दहा गट हे महिलांसाठी राखीव झाले आहेत. विविध प्रवर्गानुसार सदस्यपदांचे आरक्षण निश्चित करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांच्या हस्ते आज लॉटरी पद्धतीने ही सोडत काढण्यात आली. किरकोळ वाद वगळता आरक्षण सोडत सुरळीत पार पडली. परंतु आरक्षणाचा फटका काही दिग्गजांना बसला असून त्यांना आता पर्याय शोधावा लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

पुणे जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 73 गटांच्या आरक्षणाची सोडत सोमवारी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली जाहीर करण्यात आली आहे. या सोडतीमुळे आगामी निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या राजकीय हालचालींना वेग येणार आहे. एकूण 73 गटांसाठी काढलेल्या या आरक्षण सोडतीमध्ये विविध प्रवर्गासाठी जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात जाहीर झालेल्या आरक्षणानुसार, अनुसूचित जातीसाठी (SC) 7 गट, अनुसूचित जमातीसाठी (ST) 5 गट, तर नागरिकांचा मागासवर्गीय प्रवर्गासाठी (OBC) 19 गट राखीव ठेवण्यात आले आहेत. नागरिकांचा मागासवर्गीय प्रवर्गातील 19 गटांपैकी 10 जागा महिलांसाठी आरक्षित आहेत. सर्वसाधारण प्रवर्गासाठी सर्वाधिक 42 गट राखीव ठेवण्यात आले आहेत. त्यापैकी 20 गट महिलांसाठी आरक्षित आहेत.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा

जिल्हा परिषदेचे जाहीर झालेले आरक्षण गटनिहाय खालीलप्रमाणे:

1. नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC)

* हवेली – 37 पेरणे

* वेल्हे – 55 वेल्हे बुद्रुक

* खेड – 25 मेदनकरवाडी

* मुळशी -36 पिरंगुट

* शिरूर – 20 मांडवगण फराटा

* दौंड – 49 यवत

* आंबेगाव – 13 अवसरी बुद्रुक

* भोर – 56 वेळू

2. अनुसूचित जाती महिला (SC Women)

* इंदापूर – 71 लासुरने

* इंदापूर – 70 वालचंदनगर

* बारामती – 61 गुणवडी

* हवेली – लोणी काळभोर (पूर्वी खुला गटामध्ये समावेश)

3. अनुसूचित जमाती महिला (ST Women)

* जुन्नर – 8 बारव

* जुन्नर – 1 डिंगोरे

* आंबेगाव – 9 शिनोली

4. नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला (OBC Women)

* खेड – 22 कडूस

* बारामती – 60 सुपा

* हेवली – 40 थेऊर

* शिरूर – 15 न्हावरा

* जुन्नर – 4 राजुरी

* जुन्नर – 6 नारायण

* जुन्नर – 2 ओतूर

* पुरंदर – 53 नीरा शिवतक्रार

* जुन्नर – 5 बोरी बुद्रुक

* इंदापूर – 67 पळसदेव

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

5. सर्वसाधारण महिला (General Women)

* खेड – 23 रेटवडी

* दौंड – 47 पाटस

* बारामती – 63 वडगाव निंबाळकर

* शिरूर – 19 तळेगाव ढमढेरे

* इंदापूर – 69 निमगाव केतकी

* मावळ – 31 खडकाळे

* आंबेगाव – 11 कळंब

* दौंड – 44 वरवंड

* शिरूर – 18 शिक्रापूर

* आंबेगाव – 10 घोडेगाव

* मावळ – 30 इंदुरी

* हवेली – 42 खेड शिवापूर

* खेड – 26 पाईट

* इंदापूर – 66 भिगवण (पूर्वी अनुसूचित जातीसाठी राखीव)

* शिरूर – 16 रांजणगाव गणपती

* खेड – 28 कुरुळी

* मावळ – 33 सोमाटने

* इंदापूर – 73 बावडा

* पुरंदर – 50 गराडे

* हवेली – 38 कोरेगाव मुळ

या आरक्षण सोडतीमुळे अनेक विद्यमान सदस्यांचे गट आरक्षित झाले आहेत. तर काही ठिकाणी नव्या इच्छुकांना संधी मिळणार असल्याने आगामी जिल्हा परिषद निवडणूक चुरशीची होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. ज्यांचे गट आरक्षित झाले आहेत त्यांना आत नवा गट शोधावा लागणार आहे. त्या ठिकाणी त्यांना मोर्चे बांधणी करावी लागेल. अशा वेळी एकाच गटात अनेक जण इच्छुक असणार आहेत. त्यातून आता राजकीय पक्षांना मार्ग काढावा लागणार आहे.