पुढचा बॉम्ब तयार! धंगेकर ऐकण्याच्या मुडमध्ये नाहीत?; शिंदेंचीही मुकसंमतीच? चंद्रकांतदादांच्या अडचणीत वाढ

0

पुण्यातील गुन्हेगारीवरून काही दिवसांपासून निलेश घायवळ प्रकरणावरून महायुतीमधील नेत्यांवरच शिवसेनेचे पुणे महानगर प्रमुख रवींद्र धंगेकर हे सडकून टीका करत आहेत. यापूर्वी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर त्यांनी टीका केल्याने एकच खळबळ उडाली होती. धंगेकर हे मित्रपक्षालाच ते टार्गेट करत असल्याने भाजप नेते नाराज आहेत. त्यांनी थेट एकनाथ शिंदेंकडे धंगेकरांची तक्रार केली होती.

शिंदे पुण्यामध्ये आले असताना त्यांनी रवींद्र धंगेकर यांची भेट घेतली आणि धंगेकरांना दंगे नको, असं सांगितलं. मात्र, त्यासोबतच पुण्यातील गुन्हेगारीवर देखील चाप बसला पाहिजे, म्हटले. त्यामुळे शिंदेच्या सूचनेनंतर रवींद्र धंगेकर हे राष्ट्रवादी आणि भाजपमधील मित्र पक्षातील नेत्यांवरती बोलणं बंद करणार का? असाच प्रश्न उपस्थित केला जात होता.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन

पण शिंदेंच्या सूचनेनंतरही धंगेकर यांनी आपण या प्रकरणात असंच बोलत राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. आपण सर्वप्रथम पुणेकर असून ज्या गुन्हेगारीमुळे पुणेकर त्रासले आहेत त्याबद्दल आपण बोलणारच असल्याचे सांगत या प्रकरणामध्ये आपल्याकडे आणखीन मोठ्या प्रमाणात मालमसाला असून याबाबत मोठा खुलासा करणार असल्याचे सांगितले आहे.

याबाबत धंगेकर आज प्रेस कॉन्फरन्स घेऊन सविस्तर माहिती देणार आहेत. धंगेकर कोणता मोठा गौप्यस्फोट करणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. या गौप्यस्फोटामुळे राष्ट्रवादी काँग्रेस की भाजपचा कोणता नेता अडचणीत येणार याची देखील चर्चा आहे. मात्र, धंगेकरांनी कोणत्याही नेत्याबाबत बोलणार हे स्पष्ट केले नाही.

अधिक वाचा  कोथरूडला ऐन दिवाळीत ‘तात्काळ’ कारवाई धडाका?; भाजपाची एक तक्रार अन् पालिका प्रशासन तडफदार

गुंड निलेश घायवळ याला बनावट कागदपत्रांच्या आधारे परदेशात पळून जाण्यासाठी सत्ताधारी पक्षातील काही नेत्यांनी मदत केली असल्याचा आरोप रवींद्र धंगेकर यांच्याकडून गेल्या काही दिवसांपासून करण्यात येत आहे. त्यामुळे घायवळबाबत हा गौप्यस्फोट असेल का याची देखील चर्चा आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील आपण काँग्रेसमध्ये नाही तर शिवसेनेत आहोत याचा धंगेकर यांना विसर पडला असावा, असा खोचक टोला लगावला होता. तर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील याबाबत माध्यमांनी विचारला असता मी धंगेकरांच्या बॉसशी बोलणार, असल्याची प्रतिक्रिया दिली होती.