धनंजय मुंडे म्हणजे पुरुष वेश्या, शरद पवार यांच्या खास शिलेदाराची जीभ घसरली

0

“निवडणूक आयोग ऑफिसमध्ये बसून ईव्हीएम हॅक होत नसल्याचे सांगत आहे. मात्र तीच मशीन दहा मिनिट माझ्याकडे द्या, काय तंत्रज्ञान आहे, तुम्ही काय घोटाळे केलेत, कशी मते चोरलीत, हे मी पुराव्यानिशी सांगतो” असा दावा आमदार उत्तमराव जानकर यांनी केला. ते सोलापूर जिल्ह्यातील माळशिरसचे आमदार आहेत. “स्वायत्त संस्था ज्या पद्धतीने काम करत आहे, हे देशाला घातक आहे, सरकार ज्या पद्धतीने या संस्थांचा वापर करत आहे, हे देखील महाभयंकर घातक आहे” असं उत्तमराव जानकर म्हणाले. निवडणूक आयोग हा भाजपसाठी “वाल्या ” म्हणूनच काम करत असल्याचा गंभीर आरोप उत्तमराव जानकर यांनी केला.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

“कोणत्याही परिस्थितीत ज्यांनी कोणी शरद पवारांपेक्षा अजित पवार मोठा उद्धव ठाकरेंपेक्षा एकनाथ शिंदे मोठा हे चित्र तयार केले ते वाचणार नाहीत. जरी तुमच्या हातात आज सत्ता असली तरी कुठेतरी कृष्ण जन्माला येतोच” असे म्हणत त्यांनी सरकार आणि निवडणूक आयोगाला इशारा दिला. लवकरच राज्यातलं आणि केंद्रातलं सरकार जाणार असल्याचा पुनरुच्चार उत्तमराव जानकर यांनी केला. येत्या 15 जानेवारीला सर्वपक्षीय 288 पराभूत उमेदवारांबरोबर ईव्हीएम संदर्भात मुंबई येथे बैठक घेणार असल्याचं उत्तमराव जानकर यांनी जाहीर केलं.

….तर असा वाल्या कोळी तयारच झाला नसता

“धनंजय मुंडे म्हणजे “पुरुष वेश्या ” असल्याचा गंभीर आरोप उत्तम जानकर यांनी केला. धनंजय मुंडेंचा राजीनामा पहिल्याच दिवशी घ्यायला पाहिजे होता. गृहखात जागं असंत, शुद्धीवर असतं तर असा वाल्या कोळी तयारच झाला नसता म्हणत गृहमंत्री आणि सरकारच्या आशीर्वादानेच राज्यात गुंडगिरी सुरू आहे” असा आरोप जानकर यांनी केला. “सरकार आणि वाल्मिक कराडमध्ये तडजोडी होऊनच तो पोलिसांना शरण गेला. त्यामुळे घरच्यापेक्षा चांगली सोय त्याला पोलीस स्टेशनमध्ये मिळत आहे” असा आरोप उत्तमराव जानकर यांनी केला. धनंजय मुंडे यांच्यावर सध्या चहूबाजूंनी टीका सुरु आहे. त्यांची राजकीय कोंडी करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आता उत्तमराव जानकर यांनी धनजंय मुंडे यांच्या संदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार