सिंधुदुर्ग दि. १ (रामदास धो. गमरे) स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीवर लक्ष ठेवून राज्य सरकार अनुसूचित जातींमध्ये भेदभाव करून अ, ब, क, ड उपवर्गीकरण करून जाती-जातींमध्ये तेढ निर्माण करण्याचा कुटील डाव आखत आहे, अनुसूचित जाती म्हणजे फक्त बौद्ध, मातंगच नाही तर त्यात एकोणसाठ (५९) जाती येतात त्यात त्यांच्या पोटजाती व इतर पकडल्या तर त्या जवळपास बाराशे (१२००) च्या वर जातात अशी सरकारी दप्तरी नोंद आहे म्हणून याचा विचार करता एक टक्काही त्यांना फायदा होत नाही त्यातच जाती जातींमध्ये भांडण लावून त्यात वर्गीकरण करून मतांवर डल्ला मारण्याचा कुटील डाव शासन रचत आहे म्हणून हे जाती जातींतील वर्गीकरण तत्काळ थांबवा अन्यथा नाहीतर रिपब्लिकन सेना रस्त्यावर उतरेल असा सरकारला कडक इशारा सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी वैभववाडी (सिंधुदुर्ग) येथे कार्यकर्ता संवाद मेळाव्यात बोलत असताना दिला.






आनंदराज आंबेडकर आपल्या भाषणात पुढे “जातीनिहाय जनगणना ही झाली पाहिजे तरच खऱ्या अर्थाने कोणत्या जातीत किती लोकसंख्या आहे याचा सरकारला अंदाज येऊन त्यांच्या विकास व उन्नतीच्या दृष्टीने पाऊले उचलता येतील म्हणून त्यानुसार प्रथम विचार करून जातीनिहाय जनगणना करावी, कार्यकर्त्यांनी ही आपला पक्ष हा आपला स्वतःचा आहे यादृष्टीने कामांच नियोजन करून काम करा व शिंदेगट शिवसेनेसोबत आपण युती केली आहे ही संधी तुम्हाला चालून आली आहे त्याच सोन करून समाजच हित साधा” असे आवाहन केले. रिपब्लिकन सेना सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकर्ता संवाद मेळावा जिल्हा अध्यक्ष अनिल तांबे यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह (बुद्धविहार), वैभववाडी येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोकण विभाग सचिव मिलिंद जाधव यांनी आपल्या पहाडी आवाजात व ओघवत्या भाषाशैलीत केले. सदर मेळाव्याचे औचित्य साधून आनंदराज आंबेडकरांनी बाळकृष्ण जाधव यांची जिल्हाध्यक्ष व अनिल तांबे यांनी जिल्हा प्रवक्ता म्हणून निवड करून त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.
सदर मेळाव्यात कोकण प्रदेश अध्यक्ष विनोद मोरे, कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत, खजिनदार महेंद्र कांबळे, उपाध्यक्ष अशोक कणगोलकर, जिल्हा प्रभारी प्रकाश करूळेकर, चिटणीस मिलिंद जाधव, कोकण विभाग खजिनदार सुरेश मंचेकर, गोपाळ जाधव, विकास गायकवाड, संतोष साळवी, प्रकाश कासे, रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष संदेश पंचायत समितीचे खजिनदार नागसेन गमरे तसेच रत्नागिरी तालुका, लांजा तालुका आदी विभागातील कार्यकर्ते सदर मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित होते.











